सोसायट्यांची सुरक्षा गाढ झोपली!

पिंपरी – रात्रीच्या वेळी आपल्या घराचे व परिसराचे संरक्षण व्हावे यासाठी सोसायटी त्यासाठी स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमतात. मात्र हेच सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळी झोपलेले असल्याने सोसायट्यांची सुरक्षा “राम भरोसे’ असल्याचे चित्र खुद्द पोलिसांनीच उघड केले. वाकड पोलिसांच्या “सरप्राईज व्हिजीट’मध्ये हे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

वाकड पोलिसांनी हा उपक्रम राबवला ज्यामध्ये 70 पोलीस कर्मचाऱ्यांच्या 35 तुकड्या बनवून बुधवारी (दि. 31) रात्री अडीच ते चार यावेळेत अचानकपणे वाकड पोलीस ठाणे हद्दीतील 350 सोसायटींना भेट दिली. यामध्ये वाकड, रहाटणी या परिसरातील सोसायट्यांचा समावेश होता. यावेळी 50 ते 60 टक्के सुरक्षा रक्षक हे झोपलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुळात कुंपणच खिळखिळे झाल्याने चोर व दरोडेखोर यांना चोरीला चांगलाच वाव मिळत आहे. पोलीस संबंधित सोसायटी तसेच सुरक्षा एजन्सीला पत्र देऊन याबाबत माहिती देणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी पोलिसांनी काही सुरक्षा रक्षकाच्या कानाजवळ जाऊन शिट्टी वाजवली तरी त्या महाशयांना काही जाग आली नाही. तर एका ठिकाणी पोलिसांनी झोपलेल्या सुरक्षा रक्षकाच्या खिशातून मोबाईल काढून घेतला तरी त्यांना त्याची जाणीवही झाली नाही. त्यामुळे सोसायटीसाठी नेमलेले सुरक्षा रक्षक हे झोपण्याचे पगार घेत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये काही सुरक्षा रक्षक हे 60 वर्षाच्याही पुढील आहेत, काही सुरक्षा रक्षक हे इतर ठिकाणी काम करुन पुन्हा सोसायटीमध्ये रात्रपाळी करतात. त्यामुळे ते कामाच्या ठिकाणी येवून झोपतात, असेही या पाहणीमध्ये स्पष्ट झाले. पोलिसांच्या प्राथमिक निदर्शनानुसार सोसायटीचा सुरक्षा रक्षक हा सोसायटीमध्ये येणाऱ्या गाड्यांसाठी गेट उघडणे व सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या गाड्या पुसण्याचेच मुख्य काम करतो. त्यामुळे सुरक्षा हा त्यांच्या नोकरीसाठी दुय्यम भाग आहे.

निदर्शनास आलेले मुख्य मुद्दे
– 350 पैकी 148 सोसायट्यांमधील सुरक्षा रक्षक झोपले होते
– कानाजवळ शिट्टी वाजवूनही सुरक्षा रक्षक उठेना
– सुरक्षा रक्षकाच्या खिशातून मोबाईल काढला तरी जाग येईना
– सोसायट्यांची सुरक्षा रक्षकांसाठी विशेष अशी नियमावली नाही
– सीसीटीव्हीची पाहणी सोसायट्यांकडून वेळोवेळी होत नाही
– नेमणूक केलेले 50 टक्‍के सुरक्षा रक्षक हे वयोवृद्ध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)