सोसायटी मेंटेनन्सच्या वादातून एकाला मारहाण

पिंपरी – सोसायटी मेंटेनन्सच्या हिशोबाच्या वादातून दोघांनी संगनमत करून सोसायटीतील एका सभासदाला मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 22) रात्री साडेदहाच्या सुमारास चिखली येथे घडला.

प्रमोद दीक्षित (वय 43, रा. चिखली, पुणे) यांनी नवनाथ कळशेट्टी, रफिक कुरेशी (दोघे रा. डी – 34, मोरयाधाम हाऊसिंग सोसायटी घरकुल, चिखली पुणे) यांच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

आरोपी आणि फिर्यादी एकाच इमारतीमध्ये राहतात. दोन्ही आरोपींनी संगनमत करून प्रमोद दीक्षित यांच्यासोबत पूर्वीच्या सोसायटी मेंटेनन्स वरून भांडण काढले. भांडणात आरोपींची दीक्षित यांना लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. तसेच त्यांनी दीक्षित यांच्या खिशातून जबरदस्तीने चौदा हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)