सोसायटीच्या दारातच टॅंकरने मुलास चिरडले

 

पुणे,दि.29-सोसायटीच्या आवारात सायकल खेळणाजया मुलाचा टॅंकरच्या धडकेत मृत्यू झाला. हडपसर परिसरातील हांडेवाडी रोडवरील ईसीपी सोसायटीमध्ये रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
रोशन चंद्रसिंग बिस्ट (13) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी रोमिता चंद्रसिंग बिस्ट यांनी फिर्याद दिली आहे
त्यानुसार टॅंकरचालकाविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बिस्ट यांचा मुलगा हा ते राहत असलेल्या ईसीपी सोसायटीच्या परिसरात सायकल खेळत होता. तो सायकलवरून सोसायटीच्या प्रवेशव्दारातून आत प्रवेश करीत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टॅंकरने त्याला जोरात धडक दिली. त्यामध्ये गंभिर जखमी झाल्यामुळे रोशचा मृत्यू झाला. याप्रकरणी टॅंकरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक आर.डी.गायकवाड हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)