सोसायटींमधील समस्यांसाठी आमदार सरसावले!

पिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध सोयट्यांमधील नागरिकांना बांधकाम व्यावसायिकांकडून अपेक्षीत किंवा निर्धारित केलेल्या सुविधा मिळत नाहीत. सोसायटीचा प्लॅन, सॅंक्‍शन ते बिल्डिंग कम्पिशन, सोसायटी हॅन्ड ओव्हर करण्याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. विकसकांच्या मनमानीमुळे सोसायटीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य सदनिकाधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.

आमदार लांडगे यांनी मतदार संघातील नागरिकांना आवाहन केले आहे की, गेल्या 4 ते 5 वर्षामधील बिल्डर तथा विकसक यांच्यासोबत आपल्या प्रस्तावित किंवा कार्यरत असलेल्या सोसायटीचा प्लॅन, सॅंक्‍शन ते बिल्डिंग कम्प्लिशन, सोसायटी हॅन्ड ओव्हर संदर्भात कोणत्याही समस्येसाठी किंवा तक्रारीबाबत सर्व फ्लॅटधारकांची यादी व संपर्क क्रमांक, बिल्डर तथा विकसक यांचे नाव व संपर्क क्रमांक तसेच सोसायटीची संपूर्ण माहिती या सर्वांची संबंधित सर्व माहिती सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सोसायटी लेटर हेडवर माझ्या जनसंपर्क कार्यालयात द्यावी. तसेच, ई-मेल अथवा व्हाट्‌सअपद्वारे माझ्याकडे पाठवावी.

समतोल विकासासाठी सामोपचाराने मार्ग…
भोसरी मतदारसंघाचा समतोल विकास साधायचा असेल तर आपला व बिल्डर तथा विकसक यांचेमधील वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी मी पुढाकार घेत आहे. याबाबत संबंधित बिल्डर तथा विकसकांनी तशी तयारी न दर्शवल्यास संबंधित शासकीय कार्यालयाद्वारे त्यांचेवर कडक कारवाई करण्यास मी कटिबद्ध आहे. भोसरी मतदारसंघातील पिं. चिं. महानगरपालिका व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या हद्दीतील तयार झालेल्या गेल्या 4 ते 5 वर्षापासून किंवा त्यापूर्वीही जर काही सोसायटी व बिल्डर तथा विकसक यांचेशी जे काही वाद असतील ते सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असेही आमदार लांडगे यांनी भोसरीकरांना केलेल्या जाहीर आवाहनात म्हटले आहे.

समस्यांबाबत संपर्क क्रमांक :
आमदार महेश लांडगे : 9922609666
परिवर्तन हेल्पलाईन : 9379909090


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)