सोशल मीडिया ठरवते ‘बिअर्ड’ स्टाईल…

सध्या तरुणांमध्ये दाढी ठेवण्याचे तसेच वेगळ्या बिअर्ड स्टाईल वाढवण्याचे प्रमाण मोठ्या स्वरूपात दिसून येते आहे. त्यातूनच आपल्या चेहऱ्याला एक वेगळा आणि हटके लुक कशा प्रकारे मिळेल याकडे कॉलेज कुमारांबरोबर मोठी माणसे देखील मोठ्या प्रमाणात याकडे लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. याचसाठी जास्ती प्रमाणात पैसे देखील खर्च होत असून यामध्ये आणखी एक भर पडलेली आपल्याला दिसून येते ती म्हणजे आपला आवडता कलाकार किंवा आवडत्या खेळाडूची कोणत्या प्रकारची बिअर्ड (दाढी) ची स्टाईल आहे. तशी स्टाईल ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि यासाठी अनेक हटके लुक यामुळे ‘फेमस’ होताना दिसत आहेत.

हैदर चित्रपटातील शाहिद कपूर चा ‘कूल’ असा लूक, आमिर खानचा ‘राजपूत’ लुक, वरून धवनचा ‘सिरीयस’ लुक, सैफ अली खानचा ‘हैप्पी एडिंग’ मधला कूल लुक देखील त्याच्या चाहत्यांमध्ये मोट्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. सध्या इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीचा ‘कूल’ आणि ‘डॅशिंग’ बिअर्ड लूक सुद्धा चांगलाच प्रसिद्ध आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर आपल्याला हवी तशी आणि चांगली, उत्तम दाढी (बिअर्ड) वाढविण्यासाठी बाजारात आणि सोशल साईट वरून देखील आपण Beardo Godfather, UrbanGabru Beard Oil, Ustraa Mooch and Beard, The Man Company Oil, Brylcreem Beard Oil अशा नामांकित कंपन्यांचे तर सर्व सामान्य व्यक्तीला परवडतील अशी बिअर्ड प्रोडक्‍ट बाजारात आणि समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. तसेच ह्या प्रोडक्‍टची किंमत ही 500 ते 2000 रुपयांपर्यंत आहे. हे सर्व प्रोडक्‍ट्‌स विशिष्ट्य सामाजिक संकेतस्थळांन वरून आपल्याला घरपोच मिळवू शकतात आणि ह्याचा वापर कश्‍या प्रकारे करावा ह्याचे विडिओ देखील युट्युब आणि इंस्टाग्राम वर पाहण्यास मिळतात.

तसेच आपली दाढी चांगली वाढविण्यासाठी सुद्धा घरगुती देखील अनेक साधे व सोपे ऊपाय आहेत त्यामध्ये आपण आपल्या दाढीला रोज गरम पाण्याने धुणे तसेच आपली स्किन नेहमी स्वछ ठेवणे आवश्‍यक आहे. त्यामुळे रक्त प्रवाह चांगला होऊन दाढीची वाढ देखील चांगली आणि उत्तमरित्या होते. त्याचप्रमाणे रोजच्या आहारात देखील व्हिटॅमिन बी सारख्या गोष्टी शरीराला आवश्‍यक आहे. यासारखे व्हिटॅमिन केस (दाढी) वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त्‌ ठरतात. आणि हे सर्व व्हिट्यामिन अंडी, पालेभाज्या, मासे, दही, दूध अशा शरीराला चांगल्या प्रमाणात मिळू शकतात. म्हणूनच चांगल्या दाढीसाठी व्हिटॅमिन बी अतिशय उपयुक्त ठरते. त्यातून आपण एक चांगली आणि सुंदर बिअर्ड वाढवू शकतो ही सर्व माहिती आपल्याला सोशल मीडियावर सहज मिळू शकते. तसेच आपली दाढी चांगली दिसण्यापासून तिला वेगवेगळ्या इंफेक्‍शनपासून सुद्धा वाचविता येते. कोणत्या पद्धतीची नवीन बिअर्ड स्टाईल आल्याला जास्ती चांगली आणि सुंदर दिसेल त्यासाठी अनेक नवीन स्टाईल देखील पाहण्यास मिळतात आणि ह्या स्टाईल साठी आपण काय करायला पाहिजे हे ही सांगण्यात येते. सोशल साईट आणि वेबसाईट वर यासाठी वेगवेळ्या प्रकाचे व्हिडिओ तसेच माहिती आपल्याला सहजरित्या उपलब्ध होऊ शकते. त्यातलेच काही हटके आणि आकर्षक लुक आम्ही देखील आपल्यासाठी आणले आहेत.

1) ‘ग्रुस बिअर्ड स्टाईल’ ह्या प्रकारची दाढी लांबट चेहरा असणाऱ्या व्यक्तीला चांगली दिसू शकते. आणि त्यातूनच एक चांगला आकर्षक असा लुक देखील मिळू शकतो. हीच स्टईल सध्या विराट कोहली ने देखील ठेवलेली आपल्याला दिसून येते.

2) “केम्प्ट बिअर्ड स्टाईल’ ही स्टाईल ज्या व्यक्तीचा चेहरा गोल अशा वक्तीला ही बिअर्ड जास्ती प्रमाणात चांगली आणि सुंदर दिसते. ह्या स्टाईलसाठी किमान एक महिना तरी दाढी वाढवणे आवश्‍यक आहे. आणि या स्टाईलची एक चांगली गोष्ट म्हणजे ह्याची जास्ती काळजी घ्यावी लागत नाही.

3) “लॉग अनकेम्प्ट बिअर्ड स्टाईल’ ठेवल्याने आपली व्यक्तिरेखा आणखी सुंदर आणि आकर्षक होते. ज्याचा चेहरा गोल आणि गाल मोठे आहे अशा व्यक्तीला हा लुक जास्त चांगला दिसतो. ह्या पद्धतीची दाढी वाढल्या नंतर आपल्याला फक्त तिची नियमित काळजी घेणे आवश्‍यक असते.

– ऋषिकेश जंगम


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)