सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा ट्रोल

बॉलीवुडची “दबंग गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोनाक्षी सिन्हा आतापर्यंत कधीच आयटम सॉंग आणि बिकनी ड्रेसमध्ये दिसून आली नाही. त्यामुळे बॉलीवुडमध्ये तिची एक सुसंस्कृत मुलगी अशी ओळख झालेली आहे. मात्र, तिने आपल्या इंस्टाग्रामवर नुकत्याच टाकलेल्या एका जुन्या फोटो शेअर केला आहे. या फोटोतील पेहरावामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोलला सामोरे जावे लागले.

सोनाक्षीने इंस्टाग्रामवर एका लाल रंगाच्या ट्रांसपरंट गाऊन परिधान केलेलाच्या एक फोटो पोस्ट केला. यावरून तिला अनेकांनी ट्रोल केले. या फोटोत सोनाक्षी खूपच बोल्ड दिसत असून यावरून बोल्डनेसच्या बाबतीत तिही मागे नसल्याचे दिसून येते.

हा फोटो गतवर्षीच्या जुलै महिन्यातील आहे. या फोटोवर अनेकांनी ट्रोल करत थेट तिच्या संस्कारावरच प्रश्‍न उपस्थित केले आहे. तिला काही युझर्सने चीप असे संबोधले आहे. तर तिच्या फोटोवर एका युझर्सने कमेंट करत विचारले की तुमचे संस्कार कुठे गेले? एका दुसऱ्या युझर्सने असे म्हटले आहे की, तू या फोटोत खूप घाणेरडी दिसत आहेस. तर तिसऱ्या युझर्सने म्हटले की तू हे घातलेले कपडे देखील का नाही काढलेस असा प्रश्न नेटीझन्सने विचारले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)