सोशल मीडियावर ‘राम कदमांवर’ तुफान शाब्दिक चकमक

पुणे: भाजप आमदार राम कदम यांच्यावर सोशल मीडियावर तुफान शाब्दिक हाणामारी सुरु आहे. अनेक नागरिक ट्विटरवर त्यांच्यावर थेट हल्ला चढवत आहेत. “जिवंत माणसाला श्रध्दांजली ? दहीहंडी पासून लय भांबावला आहात रामभाऊ” अश्या प्रतिक्रिया जनसामान्यात उमटत आहेत.

व्हाट्सअँप, फेसबुक, ट्विटर सर्व सोशल माध्यमांवर लोक रॅम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. ‘पसंत असणाऱ्या मुलीला पळवून आणण्यास मदत करणार’ असे बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधात संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्षांसह संघटना रस्त्यावर उतरून राम कदमांविरोधात आंदोलने करत आहेत.

दरम्यान, पुन्हा एकदा राम कदमांची “उचलली जीभ की लावली…” अशी परिस्थिती झाली आहे. राम कदम यांनी आज ट्विटरवरून सोनाली बेंद्रेला जिवंतपणी श्रद्धांजली वाहत आणखी एक वाद ओढवून घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)