मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता आजही कायम आहे. फेसबुकने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. फेसबुक पेजवरील लोकप्रियतेचा विचार केल्यास लोकसभेतील सर्व खासदारांना मोदींनी मागे टाकलंय. मोदींच्या पाठोपाठ एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा क्रमांक लागतो. तर आम आदमी पार्टीचे पंजाबमधील खासदार भगवंत मान तिसऱ्या स्थानावर आहेत.

हैदराबादचे खासदार असलेल्या असदुद्दीन ओवेसी यांना फेसबुकने एक पत्र पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी सर्वेक्षणाचा उल्लेख करत ओवेसी यांचे अभिनंदन केले आहे. ‘सरकारी विभाग, मंत्री आणि राजकीय पक्षांच्या फेसबुकवरील पेजचं आणि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाचे आम्ही सर्वेक्षण केले. यासाठी फेसबुक पेजवरील 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीतील पोस्ट, त्यावरील रिअॅक्शन, कमेंट्स, शेअर्स यांचा विचार करण्यात आला. तुम्हाला (असदुद्दीन ओवेसींना) हे समजल्यावर आनंद होईल की फेसबुक पेजवरील लोकप्रियतेच्या बाबतीत लोकसभेतील सर्व खासदारांमध्ये तुम्ही दुसऱ्या स्थानावर आहात,’ असे फेसबुकने ओवेसींनी लिहिलेल्या पत्रात म्हटले.

एप्रिल महिन्यात फेसबुकने देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या क्रमांकावर होते. या यादीत राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे दुसऱ्या, तर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी तिसऱ्या स्थानावर होते. विशेष म्हणजे हे तिघेही भाजपाचे नेते आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)