सोशल मीडियावरील बनावट व्हिडियोबाबत लष्कराची सूचना

नवे दिल्ली: भारतीय लष्कराने सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका बनावट व्हिडियोबाबत सावधगिरीची सूचना दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर पानावर लष्कराने म्हटले आहे, की लष्करी वेषातील एक व्यक्‍ती केरळमधील पूरपरिस्थितीबाबत आणि केरळ सरकार मदत कार्य योग्य करू देत नसल्याबद्दल खोटी माहिती सांगत आहे. लष्करी पोषाखातील हा जवान तोतया असल्याचे ट्‌विटमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.

भारतीय लष्कराच्या एडीजी पीआय (ऍडिशनल डिरेक्‍टोरेट जनरल ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशन) यांनी ही माहिती देताना म्हटले आहे, की लष्कराचा वेष परिधान केलेली आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याबद्दल मल्याळम भाषेत म्हणते की, तुम्ही भारतीय लष्कराला मदत कार्याचे नियंत्रण का करू देत नाही? लष्कराशी तुमचे काय वैर आहे? तुमचे मंत्री कोडियेरी बालकृष्णन यांना केरळमध्ये लष्कराची मदत नको आहे का? भारतीय लष्कर केरळमध्ये मदतकार्य उत्तम प्रकारे करत असल्याचे स्पष्ट करून बनावट व्हिडियोतील हा तोतया जवान अफवा पसरवत असल्याचा सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)