सोशल मीडियावरही हवी नियमावली

वादग्रस्त टिप्पणी आणि शेरेबाजी केल्यामुळे स्वरा भास्कर सातत्याने ट्रोल होत राहिली आहे. तिने वैतागून काही काळासाठी आपले ट्विटर अकाउंटही बंद करून टाकले होते. आता तर ती या ट्रोलिंगला इतकी वैतागली आहे की इतर कोणत्याही सार्वजनिक क्षेत्राप्रमाणे सोशल मीडियाच्या वापरालाही नियमावली लागू करायला पाहिजे, अशी अपेक्षा स्वरा भास्करने व्यक्‍त केली आहे.

लोकांच्या भानगडीत नाक खुपसल्यानेच स्वराला अनेकदा ट्रोल व्हायला लागले आहे. सुरुवातीला तिला या ट्रोलिंगचा खूप त्रास व्हायचा. तिला खूप दुःखही व्हायचे. आपल्यावर अन्याय झाल्याची भावना तिच्या मनात यायची. मात्र नंतर तिने स्वतःला समजावले, की जीवनात असे प्रसंग येतातच. त्यामुळे स्वतःवर परिणाम होऊ देता कामा नये.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2010 मध्ये “माधोलाल कीप वॉकिंग’ मधून स्वराने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर अर्धा डझन सिनेमे तरी तिने केले आहेत. त्यातील “वीरे दी वेडिंग’मधील काही सीनमुळे ती सर्वाधिक चर्चेत आली. तेंव्हाच तिला सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल केले गेले होते. स्त्रीमुक्‍तीवादी विचार मांडण्याचा प्रयत्नही तिने याचवेळी केला होता. मात्र तिला बंडखोरी झेपली नाही. त्यापेक्षा ट्रोलिंग करणाऱ्यांपासून दूर पळण्याचा पर्यायच तिने निवडला होता. आता या सोशल मीडियावरच्या शेरेबाजीला ती कंटाळली आहे.

वर्क फ्रंटच्या बाबत बोलायचे तर “निल बटे सन्नाटा’, “अनारकली ऑफ आरा’ आणि “वीरे दी वेडिंग’सारखीच वेगळी कथा असलेल्या सिनेमा तिला हवा आहे. त्यासाठी ती एकापाठोपाठ एक पटकथा अभ्यासायला लागली आहे. हल्लीच्या पटकथांची गुणवत्ता पूर्वीपेक्षा खूपच सुधारली आहे. त्यामुळे अभ्यास खूप करायला लागतो आहे, असे तिला वाटते. “वीरे दी वेडिंग’नंतर तिने कोणताच सिनेमा केलेला नाही. बॉलीवूडमधील 9 वर्षाच्या अनुभवाच्या आधारे ती एक गोष्ट शिकली. सिनेमातील पात्रांच्या आधारे लोक आपल्याला ओळखतात. पात्रांवर आपले नियंत्रण असू शकत नाही. पण पात्राची निवड करण्याचे स्वातंत्र्य तरी असते. त्याच्या आधारे भविष्यात अधिक चांगली व्यक्‍तिरेखा निवडण्याकडे तिला लक्ष द्यायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)