सोशल मीडियाने मुलांचे बालपण हरवलं

गेल्या काही वर्षापुर्वी जेव्हा जग ऑनलाईन झाले नव्हते, गावात एखाद दुसरा टेलीफोन असायचा, आणि मुलं वाय्‌ासारखी मुक्तछंदी, खेळकर होती तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की शाळेतल्या परीक्षा संपल्या की त्यांनावेध असायचं मामाच्या गावाचे, गावातल्या आंबा, फणस, करवंदी, जांभूळ, पेरू, कलिंगड सारख्या फळांच्या झाडाचे…आणि नदी, विहीरीत मनसोक्त पोहण्या बरोबरच उनाडक्‍या करत रानोमाळ दिवस दिवस भटकत आपल्या सुट्टीतला दिवस मौज मजा करण्यात घालवण्याचे… मात्र आजच्या लहानमुलात ती ओढ दिसून येताना दिसत नाही. व्हाट्‌सप, फेसबुक सोबत ऑनलाईन झालेल्या पालकांसारखी मुलं देखील मोबाईल खेळण्यात आपले मन रमवून सुट्टी वाया घालवताना दिसत आहेत. परिणामी स्थूलता आणि अनेक आजाराना ते बळी पडताना दिसतील असे मत वैद्यकीय सूत्रांचे आहे.

अमोल पवार

घरात आई वडील आजी आजोबा मामा, मामी, काका, काकू यांची नाती मोबाईलने हिसकावुन घेतली आहेतच सोबत त्यांचे खेळ आणि खेळकर वृती देखील लोप पावताना दिसत आहे.उन्हाळा आणि उच्च तापमान अशी कारणे देवून मोबाईल मधे गेम खेळत बस असे बोलून मुलांचा खेळकरपणा संपवून टाकण्याचा पालकांचा स्वभाव आता बदलण्याची गरज आहे.मधे एक मेसेज वाचला लहान होतो तेव्हा भर उन्हात दिवसकुठे जायचा काळात नव्हता आता गुगलने पारा काय दाखवायला सुरुवात केली उन्हात जायची भीती वाटायला लागली. हे मनोगत आहे एका पस्तिशीतल्या एका पालकाचे. जोआपल्या मुलासाठी सुट्टी काढू शकत नाही परंतु त्याने त्याचे बालपण खेळकर आयुष्य शेतात, रानावनात शेळ्या म्हैशी चारण्यात आणि बालपणाची मजा चाखण्यात घालवलेले असते.
मात्र नोकरीसाठी तो शहरात राहत असतो. आणि गावाकडे त्याला येणे जमत नाही.खरा प्रश आता उपस्थित होतो कि, खेडेगावात बालपण घालवून देखील पालक आपल्या मुलाला मोबाईल सारख्या चक्रव्यूहात का अडकवत असतील? जग कितीही ऑनलाईन झाले तरी मुलांच्या शरीरात वाढत्या वयात जे बदल व्हायचे आहेत ते मैदानी खेळातूनच होत असतात,त्यांचे आरोग्य सदृढ होण्यासाठी मैदानी खेळाशिवाय पर्याय नाही हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध देखील झाले आहे.

उन्हाळा आली कि शाळेतील मुले खुश असतात त्यांच्या साठी सुट्टी म्हणजे खेळाची मेजवानीच असते.परंतु हे चित्र आता उलटे होत चालले आहे. शहरासोबत खेडयात देखील इंटरनेट आणि सोशल मेडीयाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने खेडेगावातील मुल देखील फेसबुक आणि व्हाटसअप मध्ये गुंतून गेल्याचे चित्र आहे. शेतात काम करण्याचे सोडून आपल्या आई वडिलाना मदत करण्या ऐवजी तासानतास मुल सोशल मिडीयावर ऑनलाईन असतात.आपले वडील शेतात उन्हात मर मर मरत असतात सुट्टीत त्यांच्या कामात हातभार लाऊन त्याना मदत करायची सोडून मुल हातात मोबाईल घेऊन बसतात त्यामुळे अनेक ठिकाणी शाळेतली खेळकर मुल मोबाईलच्या आहारी गेलीत कि काय असा प्रश्‍न पडतो.आपले भविष्य पुढील धेय्य याबाबत कसलाही विचार न करता फुकटच्या वेळात शाळेतल्या सुट्टी सोबत बालपण हरवत चालले आहे याची जाणीव मुलांना करून देण्याची गरज आज घडीला तीव्रतेने भासत आहे.

फेसबुकवर दिवसभर ऑनलाईन असलेली आजची मुले आपल्या समोर गावगुंड, नेते मडळी यांचा आदर्श ठेवत असतात. काका, नाना, भाऊ, आप्पा यांच्या जय जयकार करण्यात व्यस्त असणारी आजची पिढी सोशल मिडियामुळे भलत्याच मार्गाला जात असल्याची कुणकुण देखील पालकांना लागू नये इतपत पालक झोपेचे सॉंग घेत असतील तर हि बाब वाटते तितकी सोपी राहणार नाही परिणामी मुलगा हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.याची जाणीव लाडापायी मुलाला शाळेतच मोबाईल घेऊन दिलेल्या पालकाना व्हायला पाहिजे. माबील म्हणजे सर्वस्व नव्हे, मला मी लहान असताना या वस्तू मिळाल्या नाहीत मग माझ्या मुलाला मी घेऊन देणारच हा खोटा लाडूपणा काहीच कामाचा नाही. उलट त्या मुलाला सर्व प्रकारचे ज्ञान असणे आवश्‍यक आहे आणि ते त्याला योग्य वयात मिळायला पाहिजे या मताने विचार केला तर मुलाना जडणघडण होताना कसलाही त्रास होणार नाही. उलट बालपण आणि तारुण्य यामधला मध्य साधून त्यांच्यावर चांगले संस्कार करता येतील हि देखील आपली जबाबदारी आहे असे मट प्रतेक पालकांनी मनाशी ठाम करण्याची हि वेळ आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा… या अर्थपूर्ण ओळीतले बालपण आणि आपलेपण आजच्या मुलांनी पार स्प्वून टाकले आह. मुल खूप हुशार झाली आहेत त्याना कळतेपणा जरा लवकर यायला लागला आहे.याचा अर्थ मुलांचे बालपण हरवत चालले आहे असा नाही तर त्यांच्या बालपणाची फरफट होत असल्याचे आपण मान्य करायला हवे. नोकरी हा पर्याय असला तरी आपला व्यवसाय शेती आहे हे मुलाना कळायला हवं, कष्ट म्हणजे काय..? शेत म्हणजे काय? शेती कशी केली जाते? त्यातून उत्पन्न कसे मिळते? मालाला बाजारपेठ कोणती आहे? आधुनिक शेती करण्यची गरज काय हे मुलाना कळायला नको का? मोबाईल मध्ये पोस्ट कॉमेंट्‌स आणि लाईक प्रमाणे भविष्यात आपल्या शेतीला देखील चांगले दिवस आनायचे असतील तर आजची पिढी संवेदनशील बनवायला पाहिजे आणि ते काम आजच्या पालकांच्या हातात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)