सोशल मीडियाच्या युगात वाचन संस्कृती जोपासावी

हिंजवडीचे पोलीस निरीक्षक गवारी यांचे आवाहन

हिंजवडी- मोबाईल, सोशल मीडिया व इंटरनेटच्या युगात वाचन संस्कृती जोपासली जावी, असे मत हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी व्यक्‍त केले.
जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने हिंजवडीचे ग्रामपंचायत सदस्य उमेश साखरे यांच्या पुढाकारातून हिंजवडी येथे गड किल्ले व ऐतहासिक पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे, त्याचे उद्‌घाटन गवारी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. तब्बल 22 जानेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाच्या उद्‌घाटन सोहळ्यास बांधकाम व्यावसायिक रविंद्र सांकला, मुळशीचे युवा नेते सुरेश हुलावळे, बांधकाम व्यावसायिक मनोज बोकाडिया, उत्तम जांभूळकर, उपसरपंच राहूल जांभूळकर, माजी उपसरपंच प्रवीण जांभूळकर, ग्रामविकास अधिकारी तुळसीदास रायकर, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रदीप साखरे, भाजपाच्या तालुकाध्यक्षा स्वप्नाली साखरे, ग्रामपंचायत सदस्या रेखा साखरे, शिवनाथ जांभूळकर, सुनिता वाघमारे, उपनिरीक्षक नंदराज गभाले, मनोज साखरे आदि उपस्थित होते. उमेश साखरे म्हणाले की, लग्नसमारंभ व अन्य कार्यक्रमांमध्ये अनेकजण पुष्पगुच्छ घेऊन जातात किंवा सत्कार सोहळ्यांना पुप्षगुच्छ देण्याची प्रथा आहे. त्याऐवजी विविध क्षेत्राची परिपूर्ण माहिती असलेली पुस्तके भेट देता यावी म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यत आले असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, सुट्टीच्या पार्श्‍वभुमीवर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आयटीतील तरूणाईने प्रदर्शनाला मोठी गर्दी केली होती. शरद जांभूळकर यांनी सूत्रसंचालन तर उमेश साखरे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)