सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरीक-पोलीस संवाद

पिंपरी-चिंचवड पोलीसही आता “ट्विटर’वर 

ट्विटर अकाउंटचे प्रोफाईल नाव

ट्विटरच्या माध्यमातून पोलिस आणि नागरिकांशी संपर्क वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याद्वारे पोलिसांच्या कामकाजाची व कामगिरीची माहिती नागरिकांना मिळावी हा उद्देश आहे. नव्याने सुरु केलेल्या उपक्रमात Chinchwad Police असे ट्विटर अकाउंटचे प्रोफाइलचे नाव आहे. तर,  @PCcityPolice  या नावाने नवीन ट्विटर अकाऊंट सुरु करण्यात आले आहे.

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करण्यासाठी ट्विटर अकाउंट सुरु केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिसांचे उपक्रम, आवाहन आणि सूचना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. तसेच, ट्विटरच्या माध्यमातून नागरिकही तक्रारी व सूचना करु शकणार असल्याने नागरिकांना पोलिसांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र आयुक्तालय सुरु करण्यात आले. त्यानंतर, पोलीस आयुक्त आर. के.पद्मनाभन यांनी पोलीस आणि नागरिक यांच्यामधील संवाद वाढण्यासाठी अनेक उपक्रम सुरु केले. नागरिकांना त्यांच्या तक्रारी, सूचना पोलिसांपर्यत तत्परतेने मांडता येण्यासाठी आता ट्विटर अकाउंट सुरु करण्यात आले आहे. यामुळे, नागरिकांना पोलिसांशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. तसेच, या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यास मदत होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)