सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा – डॉ. प्रशांत नारनवरे

पालघर : आजच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असून याचा उपयोग चांगल्या संदेशासाठी झाल्यास खऱ्या अर्थाने लोक प्रबोधन करता येईल. समाज माध्यमांचा वापर करताना सजगता असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सोशल मीडिया महामित्र उपक्रमांतर्गत संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. नारनवरे म्हणाले की, समाज माध्यमे हे चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक उपयुक्त माध्यम आहे. या माध्यमांचा वापर करताना प्रत्येकाला या माध्यमांबाबत ज्ञान व जाण असणे आवश्यक आहे. सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारचा प्रभाव या माध्यमांमुळे समाज मनावर होत असतो. कोणत्याही माहितीची देवाण-घेवाण करताना त्याची सत्यता तपासणे आवश्यक आहे.

या गटचर्चेत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या उमेदवारांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी पालघर, वसई, बोइसर, विक्रमगड, डहाणू, नालासोपारा या सहा क्षेत्रातून प्रत्येकी 10 उमेदवार निवडण्यात आले होते. या गटचर्चेत सहभागींनी विशेषत: ग्रामीण भागातील युवकांनी समाज माध्यमांवर साधक बाधक चर्चा केली. महामित्र उपक्रमातून काय साध्य होईल? समाज माध्यमे किती दिवस? समाज माध्यमे वरचढ की इलेक्ट्रॉनिक माध्यमे? समाज माध्यमांचा उपयोग शासनाने कसा करावा? समाज माध्यमांवर प्रतिबंध हवेत? की नकोत? विधायक संदेशातून विवेकी समाज घडेल? समाज माध्यमांचा प्रभाव किती खरा किती खोटा? अशा विषयांवर यामध्ये चर्चा करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)