सोशल मिडीयामुळे सापडला हरवलेला मुलगा

 

रहिमतपूर पोलिसांनी सोशल मिडीयाचा अत्यंत खुबीने केलेल्या वापरामुळे मुलाला आई-वडील मिळाल्याने पोलिसांचे कौतूक होत आहे.

 

सातारा, दि. 23 (प्रतिनिधी) – आजकाल समाजमाध्यमांचा वापर अन् त्यामुळे समाजात वाढत असलेली तेढ हा यंत्रणा व समाजाची डोकेदुखी ठरत असताना रहिमतपूर पोलिसांनी मात्र याच सोशल मिडीयाचा अत्यंत खुबीने वापर करत हरवलेल्या मुलाला त्याच्या आई-वडीलांच्या ताब्यात देत नवा आदर्श निर्माण केला आहे.
रहिमतपुर शहरातील रोकडेश्वर गल्लीतील बारा वर्षाचा मुलगा हरवल्याची तक्रार त्या मुलाच्या आईने रहिमतपूर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करत रहिमतपूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सोशल मिडीयाचा वापर करण्याचे ठरवत पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ’रहिमतपूर बीट 100’ नावाचा एक व्हाट्स अ‍ॅपला ग्रुप तयार केला होता. पोलिसांनी या घटनेची अधिक तपासणी करत लगेच हरवलेल्या लहान मुलाची छायाचित्रे आणि व्हाट्सएप ग्रुपवरील त्याचे वर्णन शिवाय, विविध दैनिकात प्रकाशित झालेल्या बातम्या असे सगळे सोशल मिडीयावर टाकत तसा मुलगा दिसून आल्यास रहिमतपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. पोलिसांच्या अवाहनाला साद देत त्याच व्हाट्सएप ग्रुपवरील सदस्यांनी पोलिसांना हरवलेल्या मुलाची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार रहिमतपूर पोलिसांनी शहरातील भैरोबा गल्ली या ठिकाणी जात त्या मुलाला ताब्यात घेत त्याच्या आई-वडीलांच्या हवाली केले. रहिमतपूर पोलिसांनी सोशल मिडीयाचा अत्यंत खुबीने केलेल्या वापरामुळे मुलाला आई-वडील मिळाल्याने पोलिसांचे कौतूक होत आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)