सोशल मिडिया-शाप की वरदान लांडेवाडीत देखावा

मंचर – न्यू इंग्लिश सीबीएसई स्कूल लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे सेल्फीचा अतिरेक, मोबाईलचा वेडेपणा कसा जिवावर बेततो त्यावर भाष्य केले. पाल्याचा मित्रपरिवार, मोबाईलचा अट्टाहास, इंटरनेटचा दुरुपयोग, सेल्फीचा आग्रह यावर भाष्य करणारा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
श्री गणरायाचे आगमन झाले. सतत 10 वर्षांची परंपरा ठेवत भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गणरायाची स्थापना संस्थेचे सचिव अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या व्यवस्थापिका शामल चौधरी, प्राचार्या शबनम मोमीन, उपप्राचार्या रजनी बाणखेले यांनी केले. हा देखावा शाळेच्या कलाशिक्षकांनी तयार केलेला असून देखाव्या संदर्भातच स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पपेट शोचे सादरीकरण केले आहे. या शोद्वारे सादरीकरण केले आहे. या ठिकाणी सामाजिक संदेश देणारा ज्वलंत समस्येवर भाष्य करणारा पालकांची डोकेदुखी ठरणारा, सोशल मिडिया-शाप की वरदानया सकारात्मक व नकारात्मक बाजू मांडणारा सुंदर देखावा साकारण्यात आलेला आहे. आपल्या पाल्याचा मोबाईल, इंटरनेट, संगणक वापर कोणत्या दिशेला जात आहे याकडे लक्ष ठेवून होणारे संभाव्य धोके वेळीच थांबविण्याचे आवाहन स्कूलच्या प्राचार्या शबनम मोमीन यांनी केले. या गणेशोत्सवाची सांगता इ. 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांच्या ढोल-ताशा व लेझीम पथकाच्या मिरवणुकीने होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)