सोशल मिडियामुळे भेटकार्डांच्या मागणीत घट

पिंपरी- दिवाळीसाठी विविध प्रकारची आकर्षक भेटकार्ड बाजारात दाखल झाली आहेत. मात्र, सोशल मिडियामुळे भेटकार्डला मागणी घटल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी असल्याची खंत विक्रेता चेतन शहदादपुरी यांनी व्यक्‍त केली. यंदाही रंगीत तसेच अप्रतिम मजकुराची भेटकार्ड बाजारात दाखल झालीत. सोशल मिडीयामुळे भेटकार्ड खरेदी अंदाजे 40 टक्के मागणी घटली. त्यामुळे यंदा फक्‍त हौशी नागरिकांकडून भेटकार्डची मागणी आहे. चार-पाच वर्षांपूर्वी दिवाळीला सुरुवात होण्यापूर्वी काही दिवसा अगोदरच भेटकार्ड खरेदी करण्यासाठी तरुणाई व नगारीक मोठी गर्दी करायचे. यात विविध प्रकारच्या आकर्षक व मराठी मजकूर असलेल्या भेटकार्डला मोठ्या प्रमाणावर मागणी असायची. त्यांनतर मराठी सोबतच इंग्रजी मजकुराच्या भेटकार्डला देखील मागणी वाढली. तरुणांपासून आबालवृद्धापर्यंत भेटकार्डची मागणी होत असे. डिजीटिलीकरणाचा फायदा आहेच; मात्र भेटकार्ड व्यवसायाला फटका बसला.

सध्या आकर्षक मजकुराच्या पणतीच्या भेटकार्डला मागणी आहे. बाजारात फॅन्सी, म्युझीकल भेटकार्डही उपलब्ध आहेत. मोठ्या आकाराच्या भेटकार्डच्या किंमती 15 ते 150 रुपयांपर्यंत आहे. मध्यम आकाराच्या व म्युझीकल भेटकार्डंना तरूणाईकडून मागणी आहे. पूर्वी हाताने तयार केलेल्या भेटकार्डची मागणी असे. यात “वारली’ या आदिवासी चित्रकलेचा वापर केलेल्या कार्डला जास्त मागणी होती. मात्र, यंदा बाजारात ती कमी प्रमाणात आली आहेत. त्यामुळे निवडक भेटकार्ड उपलब्ध आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भेटकार्डाची प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास जागा असते. लहानपणी स्वतःच भेटकार्ड तयार करून रंगवून खास मैत्रिणीला-मित्राला देण्यात एक वेगळीच मजा असायची. आज धावपळीच्या जीवनात वेळच मिळत नसल्याने विकतचेच भेट कार्ड घ्यावे लागते. इंटरनेटमुळे त्याचेही प्रमाण कमी झाले आहे. पण, माझ्यासारखे खास माणसांसाठी आवर्जुन भेटकार्ड देतात.
-कोमल मोरे, तरुणी.

पूर्वी भेटकार्डसाठी मोठ्या प्रमाणात मागणी व्हायची. आता काहीच जणांकडूनच मागणी होत आहे. सोशल मीडियामुळे यापुढे अजून मागणी कमी होण्याची शक्‍यता आहे. मात्र, भेटकार्ड देण्याची, तसेच दिलेले भेटकार्ड जपून ठेवण्याची हमी सोशल मीडिया देऊ शकत नाही.
चेतन शहदादपुरी, विक्रेता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)