सोळू, आळंदी परिसरात शेतकरी दिन साजरा

चिंबळी- पद्मश्री डॉ. विठ्ठल विखे पाटील यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सोळू व आळंदी परिसरात विखे पाटील यांनी केलेल्या कार्याचे शेतकऱ्यांना स्मरण व्हावे हेतूने कृषी विभागाकडून शेतकरी दिन साजरा करण्यात आला. या भागात जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने फळबाग योजना व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना पाने खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मरकळ परिसरात शेतकऱ्यांनी उसाचे पीक मोठ्याप्रमाणात घेऊन त्यामध्ये अंतरपीक म्हणून भूईमुग, चवळी, हरभरा, कांदे, कोबी, मेथी, कोथिंबीर आदि पिके घेत असल्याने या पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी कृषी सहाय्यक अर्चना मोरे, मनिषा घोडगे यांनी मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)