सोळशी गावाचा आदर्श राज्यभर पोहोचविणार

राज्याध्यक्ष डी. डी. सोनटक्के यांचे प्रतिपादन

भुईंज – लोकसंत गाडगे बाबा यांच्या विचारांचा जागर सोळशी ता. कोरेगाव या गावाने जिल्ह्याला सांगितला असून गावाचे गावपण व लोकसंतांचे मोठेपण सांभाळणाऱ्या सोळशी गावाचा आदर्श राज्यभर पोहचवणार असल्याचे प्रतिपादन परिट समाजाचे आरक्षण समन्वय समितीचे राज्यध्यक्ष डी. डी. सोनटक्के यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोळशी, ता. कोरेगाव या ठिकाणी लोकसंत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोळशी गावाने भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून परीट समाजाचे राज्यातील नेत्यांसह पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

20 डिसेंबर यादिवशी सर्वच गावात संत गाडगे बाबांची पुण्यतिथी साजरी केली जाते. परंतु सोळशी ता. कोरेगाव येथे या सोहळ्याला लोकसोहळा म्हणून ग्रामस्थ साजरा करतात. येथे कोणतेही गट-तट जात-पात यांच्याशिवाय माणुसकीची पेरणी करणारे विचार हातात घेवून प्रत्येक ग्रामस्थ यात सहभागी होत असतो. गावाच्यावतीने सार्वजनिक स्वच्छता अभियान राबविल्यानंतर गाडगे बांबाच्या प्रतिमेचे पुजन करून भजन, किर्तन, महाप्रसाद झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मातीतील सर्व संतांच्या प्रतिमेची मिरवणूक सजवलेल्या बैलगाडीतून गावातून काढण्यात आली. येथील परीट समाजाचे नेते विनायक आनंदराव पिसाळ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील परीट समाजाचे आदर्श कार्यकर्ते नेते यांना समाजगौरव पुरस्कार देवून सन्मानित केले.

यामध्ये आरक्षण समितीचे अध्यक्ष डी. डी. सोनटक्के, कार्याध्यक्ष राजेंद्रशेठ खैरनार, महासचिव अनिल शिंदे, पश्‍चिम महाराष्ट्राचे नेते बळवंतराव साळुंखे, कॅप्टन बी. जी. शेडगे, सातारा जिल्ह्याचे नेते भिकू राक्षे, आप्पा हवाळे, प्रा. पवार यांच्यासह विविध मान्यवरांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)