सोळशीत चिमुरड्या भावांचा बुडून दुर्दैवी अंत

पिंपोडे – सोळशी, ता. कोरेगांव येथील बांधकामासाठी पाणी साठवणूक करणाऱ्या खड्ड्यात खेळता-खेळता दोन मुले पडून बुडाली. मंथन मारुती म्हसे व सोहन मारुती म्हसे अशी दुर्दैवी भावडांची नावे आहेत. पोटच्या दोन्ही गोळ्यांचा असा मृत्यू झाल्याने आई ज्योती म्हसे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, सोळशी येथे इंद्रसेन सोळस्कर यांच्या फार्म हाऊसवर ज्योती मारुती म्हसे या कामगार आहेत. त्या नेहमीप्रमाने सकाळी दहा वाजता घरातील कामे करत होत्या तर त्यांची मंथन (वय 4) व सोहम (वय 2) ही दोन्ही मुले बाहेर खेळत होती. खेळता-खेळता दोन्ही भावंडे शेजारी बांधकामासाठी पाणीसाठा करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्याकडे गेली व या खड्डयात पडली.

-Ads-

बराचवेळ मुले नजरेस पडल्याने आईने शोधाशोध सुरू केली. मात्र, ती आढळून आली नाहीत. थोड्यावेळाने मुले खड्ड्यातील पाण्यात तरगंत असताना दिसली. त्यांना बाहेर काढले, मात्र, त्यांचा मुत्यू झाला होता. याबाबतची फिर्याद सोळशीचे पोलीस पाटील यांनी वाठार पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक पाटील करीत आहेत. दरम्यान, पोटच्या दोन्ही गोळ्यांचा असा मृत्यू झाल्याने ज्योती म्हसे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)