सोल्सजेयर यांनी केले पहिल्याच सामन्यात प्रभावित

कार्डिफ: जोसे मोरिनहो यांच्या पायऊतारानंतर मॅंचेस्टर युनाइटेडचे काळजीवाहू प्रशिक्षक ओले गनर सोल्सजेयर  यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्डिफ विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मॅंचेस्टर युनाइटेडला 4-1 असा मोठा विजय मिळवून दिला आहे. नवोदित खेळाडूंना अग्रस्थानी ठेऊन आखलेली रणनीती त्यांच्या विजयाचे गमक ठरली.

सामन्याच्या चौथ्या मिनिटाला फ्री केकवर मार्कस रॅशफोर्डने गोल करत संघाचे युनाइटेडचे खाते उघडले. त्यानंतर 29व्या मध्यरक्षक अंडर हरेराने गोल करत आघाडी वाढवली. चुकीच्या पद्धतीने कॅव्हेन्दू हाताळ्याने 38 व्या मिनिटाला कार्डिफला पेनल्टी बहाल करण्यात आले त्याचा फायदा घेत त्याने पहिला गोल केला. परंतु, 41व्या मिनिटाला मार्शलने गोल करत युनाइटेडला 3-1 अशी बढत मिळवून दिली. त्यानंतर 57 आणि 90 व्या मिनिटाला गोल करत लिंगार्डने युनाइटेडला 5-1 असा मोठा विजय मिळवून दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)