सोल्ड !!

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या बाराव्या हंगामाचा लिलाव जयपूरमध्ये नुकताच पार पडला या लिलावात युवा खेळाडूंनी छाप सोडली एकीकडे युवराज सिंग सारख्या सिक्‍सर किंगला कोणताही संघ घ्यायला तयार नव्हता तर दुसरीकडे दोन युवा खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी संघ मालकांत चढाओढ लागली होती. हेच दोन युवा खेळाडू या वर्षीच्या लिलावातील मुख्य आकर्षण होते. दोघांचीही बेसप्राईस 20 लाख होती पण त्यांना मिळाले मात्र कोट्यवधी रुपये. त्यांना मिळालेली किंमत पाहून जाणकारांसोबत क्रिकेट रसिकही अचंबित झाले!

वरुण चक्रवर्ती
अवघ्या वीस लाख बेसप्राईज असलेल्या वरुण चक्रवर्तीला किंग्स इलेव्हन पंजाबने तब्बल 8.4 कोटी रुपये मोजून खरेदी केले. वरुण चक्रवर्ती हा 27 वर्षाचा खेळाडू पहिल्यांदा चर्चेत आला तो तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये वरुणने आपल्या जादुई फिरकीने छाप सोडली आपल्या जादुई फिरकीच्या जोरावर त्याने आपल्या मदुराई पॅंथर्स या संघाला तमिळनाडू प्रीमियर लीगचे पाहिले-वहिले विजेतेपद मिळवून दिले. वरुण हा एक सर्वसाधारण फिरकी गोलंदाज नाही तर तो एक अदभुत फिरकी गोलंदाज आहे. त्याच्या भात्यात सात प्रकारचे चेंडू आहेत. ऑफब्रेक, लेगब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर, टॉप स्पिन आणि यॉर्कर या सर्व प्रकारच्या चेंडूवर त्याचे कमालीचे नियंत्रण आहे. आपल्या या वैविध्यपूर्ण चेंडूने तो फलंदाजांना बेजार करु शकतो. तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये त्याने 240 चेंडू टाकले त्यातील 125 चेंडू डॉट होते. त्यामुळेच त्याला खरेदी करण्यासाठी संघ मालकात चढाओढ लागली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवम दुबे
आय पीएल च्या या लिलावात आणखी एका युवा खेळाडूने लक्ष वेधून घेतले. शिवम दुबे या पंचवीस वर्षाच्या अष्टपैलू खेळाडूला त्याच्या बेसप्राईज पेक्षा पंचवीस पट अधिक रक्कम मिळाली. 25 वर्षीय शिवम दुबे याची बेसप्राईज होती. 20 लाख त्याला मिळाले. 5 कोटी त्याच्यासाठी रॉयल चॅलेंज बेंगलोर या संघाने बोली लावली. मुंबईचा हा अष्टपैलू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे पण त्याला इतकी मोठी रक्कम मिळेल असे कोणालाही वाटले नव्हते. मुंबईसाठी खेळणारा हा अष्टपैलू खेळाडू डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने तेज गोलंदाजी करतो शिवम हा फक्त सहा प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. या सहा सामन्यात त्याने 63 च्या सरासरीने 567 धावा काढल्या आहेत. त्यात त्याने 2 शतक व चार अर्धशतक झळकावली आहेत तसेच बावीस विकेटही मिळवल्या आहेत. शिवम पहिल्यांदा चर्चेत आला तो त्याने अनुभवी गोलंदाज प्रवीण तांबेच्या गोलंदाजीवर सलग पाच षटकार मारले होते. शिवमच्या याच खेळीने त्याला आयपीएलचा सदस्य होण्यास मदत केली.

– श्‍याम बसप्पा ठाणेदार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)