सोलो विभागात सुहानी प्रथम

लोणी काळभोर- माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बीव्हीजी- शरद मल्हार महोत्सवात आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धेत पुणे जिल्हा पातळीवर झालेल्या स्पर्धेत मोठा गट सोलो विभागात सुहानी दिलीप काळभोर हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ही स्पर्धा नुकतीच नारायणगाव येथील अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे पार पडली. तिला शरद मल्हार महोत्सव समितीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सुहानी हिला तिचे वडील दिलीप काळभोर हेच नृत्याचे शिक्षण देत आहेत. या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)