‘सोलारीस-रावेतकर करंडक’ जिल्हास्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धा

आद्या जोशी, नुपूर ठक्कर यांचा संघर्षपूर्ण विजय !

पुणे-  सोलारीस क्लब तर्फे आयोजितमसोलारीस-रावेतकर करंडकफजिल्हास्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आद्या जोशी आणि नुपूर ठक्कर यांनी ११ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये संघर्षपूर्ण विजयाची नोंद करत आगेकूच केली.

सोलारीस क्लबच्या मयुर कॉलनी येथील बॅडमिंटन कोर्ट येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या मुलींच्या गटात आद्या जोशी हिने अनुश्री जोशी हिच्यावर १४-१५, १५-१४, १५-११ असा संघर्षपूर्ण विजय नोंदविला. याच गटात नुपूर ठक्कर हिने पुर्वा वळवंडे हिचा १५-७, ११-१५, १५-१३ असा निसटता पराभव करून दुसरी फेरी गाठली. याबरोबरच आशिता कुठाळे, अभा केतकर, इक्शा मेदणे, अंजली तोंडे, स्वाती देशपांडे, अनंदीता गोडबोले, सिया बेहेडे आणि अभा केतकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

१३ वर्षाखालील मुलांच्या गटात मयांक राऊत, अर्थव नाईक, देवेश गोएल, श्रेयस शेगडे, आर्यन बागल, जीत काकडे, अर्चित दांडेकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकालः मुख्य ड्रॉः ११ वर्षाखालील मुलीः पहिली फेरीः
इक्शा मेदणे वि.वि. प्राची पटवर्धन १५-३, १५-१०;
आशिता कुठाळे वि.वि. अवनी देशमुख १५-८, १५-९;
आद्या जोशी वि.वि. अनुश्री जोशी १४-१५, १५-१४, १५-११;
अंजली तोंडे वि.वि. दिव्या खारे १५-१४, १५-९;
नुपूर ठक्कर वि.वि. पुर्वा वळवंडे १५-७, ११-१५, १५-१३;
स्वाती देशपांडे वि.वि. अवनी बेहेडे १५-४, १५-११;
अनंदीता गोडबोले वि.वि. ऋतुजा वेलणकर १५-९, १५-४;
सिया बेहेडे वि.वि. आर्या फडके १५-३, १५-७;
अभा केतकर वि.वि. गार्गी कुंटे १५-७, १५-७;

१३ वर्षाखालील मुलेः पहिली फेरीः 
मयांक राऊत वि.वि. इशान देशपांडे १५-११, १५-११;
अर्थव नाईक वि.वि. अभिरूप मुंगळे १५-७, १५-९;
देवेश गोएल वि.वि. आदित्य कुरडूकर १५-६, १५-७;
श्रेयस शेगडे वि.वि. आशितोष कुलकर्णी १५-३, १५-०;
आर्यन बागल वि.वि. ओंकार कुलकर्णी १५-१२, १५-९;
जीत काकडे वि.वि. अभिराम नामजोशी १५-५, १५-६;
अर्चित दांडेकर वि.वि. अर्थव चिवटे १५-१३, १५-१३;
ओम होजागे वि.वि. यशवंत साळोखे १५-१४, १५-७;


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)