सोलारिस-रावेतकर करंडक जिल्हास्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत 450 खेळाडूंचा सहभाग

अर्जुन खानविलकर, अक्षय घैसास, मानस भावे, सोहम खुरपडे यांनी उद्‌घाटनाचा दिवस गाजवला

पुणे: अर्जुन खानविलकर, अक्षय घैसास, मानस भावे आणि सोहम खुरपडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा संघर्षपूर्ण पराभव करून सोलारिस-रावेतकर करंडक जिल्हास्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेचा उद्‌घाटनाचा दिवस गाजवला. सोलारिस क्‍लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत 450 हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग निश्‍चित केला आहे.

अकरा वर्षाखालील मुलांच्या गटातील पहिल्या फेरीत अर्जुन खानविलकरने अर्णव क्षीरसागर याचा 13-15, 15-13, 15-12 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करून दुसरी फेरी गाठली. तसेच आणखी एका लढतीत अक्षय घैसासने अद्वैत अभ्यंकरचा 15-12, 9-15, 15-4 असा पराभव करून आगेकूच केली. त्याचप्रमाणे मानस भावेने आरिष कवठेकरचा असा कडव्या झुंजीनंतर 14-15, 15-07, 15-6 असा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

याच गटातील तिसऱ्या चुरशीच्या लढतीत सोहम खुरपडे याने श्‍लोक मेधी याचा 12-15, 15-6, 15-10 असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली. कोणार्क इंचेकर, निलय काळे, आदित्य पर्वते, आर्यन बागल, तनिष्क अडे व ओजस सोरटे या खेळाडूंनी मात्र आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर सरळ गेममध्ये मात करताना विजयी सलामी दिली.
तत्पूर्वी सोलारिस क्‍लबच्या मयूर कॉलनी येथील बॅडमिंटन संकुलात आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्‌घाटन सोलारिसचे संचालक जयंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोलारिसचे सीईओ हृषिकेश भानुशाली, क्‍लबच्या बॅडमिंटन प्रशिक्षक व स्पर्धा संचालक राजश्री वाळिंबे, तसेच क्‍लबचे व्यवस्थापक राजेश सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल-
मुख्य ड्रॉ – 11 वर्षाखालील मुले – पहिली फेरी – नील जोशी वि.वि. तन्मय कुलकर्णी 15-11, 15-5; अर्जुन खानविलकर वि.वि. अर्णव क्षीरसागर 13-15, 15-13, 15-12; अक्षय घैसास वि.वि. अद्वैत अभ्यंकर 15-12, 9-15, 15-4; मानस भावे वि.वि. आरिष कवठेकर 14-15, 15-07, 15-6;
कोणार्क इंचेकर वि.वि. हर्ष क्षीरसागर 15-7, 15-2; निलय काळे वि.वि. शिवराज मोहोळ 15-3, 15-7; आदित्य पर्वते वि.वि. त्रुशांक दांडेकर 15-6, 15-2; आर्यन बागल वि.वि. रुचिर मांडे 15-10, 15-12; सोहम खुरपडे वि.वि. श्‍लोक मेधी 12-15, 15-6, 15-10; तनिष्क अडे वि.वि. प्रद्युम्न काळेकर 15-10, 15-5; ओजस सोरटे वि.वि. रुद्रनील नाडगोंडे 15-0, 15-1.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)