सोलारिस-रावेतकर करंडक जिल्हास्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धा 

कृत्तिका, भूमी, गायत्री, सई, श्रेया, यांचे संघर्षपूर्ण विजय
सिद्धेश, निमिष, सर्वेश, अर्जुन यांचीही आगेकूच
पुणे: सोलारिस क्‍लबतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कृतिका घोरपडे, भूमी वैशंपायन, गायत्री केंजळे, सई पळशीकर, श्रेया मेहता, सिध्देश शिंदे, निमिष बागमर, सर्वेश होजी, अर्जुन देशपांडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा संघर्षपूर्ण पराभव करून सोलारिस-रावेतकर करंडक जिल्हास्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या गटातून आगेकूच केली.
सोलारिस क्‍लबच्या मयूर कॉलनी येथील बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेतील 13 वर्षांखालील मुलींच्या गटात कृतिका घोरपडे हिने दिशा झाडे हिच्यावर 13-15, 15-14, 15-8 असा विजय मिळवला. रतर ाधा फाटक हिने अद्विका जोशी हिचा 15-10, 15-10 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. 15 वर्षांखालील मुलींच्या गटात भूमी वैशंपायन हिने दानिका पळसुळे हिच्यावर 15-11, 13-15, 15-10 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
याच गटांत अटीतटीच्या सामन्यात गायत्री केंजळे हिने ऋचा गुणाजी हिचा 12-15, 15-14, 15-7 असा पराभव करून आगेकूच केली. तर सई पळशीकर हिने अनया कोटीभास्कर हिचा 8-15, 15-1, 15-9 असा चुरशीचा पराभव करून विजयी सलामी दिली. तसेच श्रेया मेहता हिने नित्या काडळे हिचा 15-13, 9-15, 15-12 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
सतरा वर्षांखालील मुलांच्या गटात सिद्धेश शिंदे याने गौरव चिंधे याच्यावर 13-15, 15-8, 15-11, तर निमिष बागमर याने ओंकार मेदाणेवर 15-10, 14-15, 15-9 असा विजय मिळवला. तसेच सर्वेश होजी याने जय पिंपळे याचा 13-15, 15-14, 15-14 असा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. 11 वर्षांखालील मुलांच्या गटात देवांश सपकाळ याने नील जोशी याचा 15-13, 15-10 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. तर अर्जुन देशपांडे याने ध्रुव निकम याच्यावर 13-15, 15-8, 15-10 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
सविस्तर निकाल- 
मुख्य ड्रॉ – 13 वर्षांखालील मुली – पहिली फेरी – रिया भालेराव वि.वि. वेदांती शहा 15-10, 15-4; कृतिका घोरपडे वि.वि. दिशा झाडे 13-15, 15-14, 15-8; उदिता बिचाडू वि.वि. श्रेया शिवडे 15-6, 15-3; ङेया मेहता वि.वि. तनिष्का लढ्ढा 15-3, 15-6; अनया देशपांडे वि.वि. सिया रासकर 15-6, 15-7; आरुषी पांडे वि.वि. निर्वी परमार 15-6, 15-14; दृवरा ढोले वि.वि. मैत्रियी पवार 15-10, 15-10; राधा फाटक वि.वि. अद्विका जोशी 15-10, 15-10; 15 वर्षांखालील मुली- पहिली फेरी- आचल जैन वि.वि. हिमाली परब 15-8, 15-5; सावनी राणे वि.वि. निधी भागवत 15-5, 15-4;
सयुरी साखळकर वि.वि. निकिता कुंटे 15-11, 15-14; भूमी वैशंपायन वि.वि. दानिका पळसुळे 15-11, 13-15, 15-10; फाल्गुनी निकुंभ वि.वि. मधूरा फडणीस 15-6, 15-4; गायत्री केंजळे वि.वि. ऋचा गुणाजी 12-15, 15-14, 15-7; सई पळशीकर वि.वि. अनया कोटीभास्कर 8-15, 15-1, 15-9; श्रेया शेलार वि.वि. संस्कृती गव्हाणे 15-6, 15-6; श्रेया मेहता वि.वि. नित्या काडळे 15-13, 9-15, 15-12; 17 वर्षांखालील मुले- पहिली फेरीे
जय पिंपळे वि.वि. क्रिश चौधरी 15-4, 15-8; वरद तळेगांवकर वि.वि. पियुष कनिकडाळे 15-5, 15-8; ध्रुव जठार वि.वि. चिन्मय फाटकर 15-10, 15-5;
सिद्धेश शिंदे वि.वि. गौरव चिंधे 13-15, 15-8, 15-11; सुजल लखारी वि.वि. आर्यन पटर्वधन 15-7, 15-13; निमिष बागमर वि.वि. ओंकार मेदाणे 15-10, 14-15, 15-9; आर्य कुरकुटे वि.वि. आर्य लेले 15-10, 15-8; भूषण पोतनीस वि.वि. आदित्य जोगळेकर 15-7, 15-8; सर्वेश होजी वि.वि. जय पिंपळे 13-15, 15-14, 15-14; 11 वर्षांखालील मुले- दुसरी फेरी- देवांश सपकाळ वि.वि. नील जोशी 15-13, 15-10; अर्जुन खानविलकर वि.वि. वेदांत कुंटे 15-6, 15-3; अक्षय घैसास वि.वि. आर्यन तोरो 15-8, 15-14; इशान महाबळेश्‍वर वि.वि. मानस भावे 15-6, 15-6; कोर्णाक इंचेकर वि.वि. समीहन देशपांडे 15-2, 15-7; नीलय काळे वि.वि. युगंधर गंधे 15-2, 15-5; आदित्य पर्वते वि.वि. तन्मय डोंगरे 15-3, 15-7; आर्यन बागल वि.वि. सोहम खुरपडे 15-4, 15-3; ओजस सोरटे वि.वि. तनिष्क अडे 15-14, 15-12; सुदीप खोराटे वि.वि. सोहम ढमे 15-6, 15-5; इशान लागू वि.वि. श्रेयान भिसे 15-6, 15-11; आर्य देशपांडे वि.वि. शौर्य नाईक 15-5, 15-5; अर्जुन देशपांडे वि.वि. ध्रुव निकम 13-15, 15-8, 15-10; वेदांत पवार वि.वि. हृषीकेश नाईक 15-2, 15-8; सार्थक पाटणकर वि.वि. आदर्श राऊत 15-6, 15-12.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)