सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकार कटिबद्ध- देवेंद्र फडणवीस

सोलापूर: सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकार कटिबद्ध आहे. एक हजार कोटी रुपयांची कामे आज सुरु होत आहेत. रोजगारनिर्मिती करणारी शहरे तयार होत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी 450 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले. उजनी धरणातून थेट पाणीपुरवठा करण्याच्या योजनेमुळे नागरिकांची पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मलनि:स्सारण आणि सांडपाणी व्यवस्थापनामुळे उपलब्ध होणारे पाणी राष्ट्रीय औष्णिक वीज प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे उजनी धरणातून या प्रकल्पासाठी देण्यात येणारे पाणी सिंचनासाठी वापरता येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद चौपदरी राष्ट्रीय महामार्ग,स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भूमिगत मलनि:स्सारण यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या तीन यंत्रणांचे लोकार्पण आणि सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये विभागवार आधारित पाणीपुरवठा व स्वच्छता यंत्रणा सुधारणा विषयक संयुक्त प्रकल्प, उजनी धरणातून सोलापूर शहराला होणारी पेयजल पुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच अमृत योजनेंतर्गत भूमिगत मलनि:स्सारण योजनेची पायाभरणी आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 30 हजार घरांचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरु होत आहेत. आवास योजनेंतर्गत 30 हजार घरांचा सर्वात मोठा प्रकल्प तयार होत आहे. या योजनेसाठी कोणत्याही अडचणी येणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. सहकारमंत्री आणि पालकमंत्री यांच्या सहकार्याने अमृत योजनेतून या घरांसाठी पायाभूत सुविधा पुरविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या सरकारच्या काळातच भूमिपूजन झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळाही याच काळात होत आहे. पालखी मार्गाचा विकास केल्याने लाखो वारकऱ्यांची सोय झाल्याचे ते म्हणाले. राज्याला सर्वोत्तम बनविण्याचा आमचा संकल्प असून केंद्र सरकारच्या मदतीने हे काम पूर्ण करु,असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून याकामी केंद्र सरकार राज्याच्या पाठिशी आहे. तात्काळ दुष्काळ पाहणीसाठी पथक पाठविण्यात आले. त्यांनी केंद्राकडे अहवाल सादर केला असून राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गास मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)