सोलापूर विद्यापीठ नामांतराला स्थगिती

संग्रहित छायाचित्र

31 मे रोजीचा कार्यक्रम रद्द : शिक्षण मंत्री तावडेंना हायकोर्टाची चपराक


परिस्थिती “जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश


पुढील सुनावणी 5 जूनला

मुंबई – सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याला विरोध असताना अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी 31 मार्च रोजी विद्यापीठाचे नामांतरण करण्याच्या राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री विनांद तावडे यांच्या प्रयत्नांना तडा गेला.

न्यायमूर्ती एस.जे. काथावाला आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने सोलापूर विद्यापीठ नामांतराला अंतरीम स्थगिती देऊन नामांतर परिस्थिती “जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश देताना याचिकेची पुढील सुनावणी 5 जूनपर्यंत तहकूब ठेवली. या निर्णयामुळे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना जोरदार चपराक बसली आहे.

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या ठरावाबरोबरच मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना तावडे यांनी 18 मे रोजी एका कार्यक्रमात बोलताना नामांतराबाबत निर्णय झाला असून 29 मे रोजीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होऊन 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी नामविस्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली.

या माहितीच्या आधारे याचिकाकर्ते शिवा-अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर घोंड यांच्यावतीने ऍड. सतिश तळेकर आणि शैलेश जकापूरकर यांच्या वतीने सुधीर हल्ली यांनी उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करून न्यायालयाचे लक्ष वेधले. यावेळी ऍड. सतिश तळेकर, ऍड. सुधीर हल्ली यांनी वस्तुस्थिती न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिली. या नामांतराला विरोध असल्याने राज्य सरकारने त्यावर चर्चा केली जाईल, मंत्रीमंडळाने स्थापन केलेल्या चार मंत्र्यांच्या कमिटी त्यावर योग्यतो तोडगा काढून निर्णय घेईल, अशी हमी न्यायालयात दिली होती. परंतू कोणतीही चर्चा न होता हा नामांतराचा घाट घातला जात असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले.

याची गंभीर दखल घेत न्यायालयाने नामांतराला स्थगिती देताना 31 मे रोजी जाहिर केलेल्या कार्यक्रमाला स्थगिती देताना “जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे निर्देश देऊन याचिकेची पुढील सुनावणी 5 जूनपर्यंत तहकूब ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)