सोलापूर विद्यापीठ नामकरणाचा तूर्त निर्णय नाही

संग्रहित छायाचित्र

मंत्रांच्या कमिटीलाही आक्षेप
या नामकरणासाठी मंत्रीमंत्रळाच्या बैठकीत स्थापन केलेल्या चार मंत्र्यांच्या कमिटीलाही ऍड. तळेकर यांनी आज जोरदार विरोध केला. चार मंत्र्यापैकी दोन मंत्री हे धनगर समाजाचे आहे. त्यापैकी एका मंत्र्यांनी गेले तीन वर्षें या नामकरणासाठी पाठपुरवा केलेला असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.

राज्य सरकारची न्यायालयात माहिती
मुंबई – सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदे ठराव आणि त्या अनुसंगाने मंत्रीमंडळाने चार मंत्र्यांची कमिटी स्थापन केली असली तरी ही कमिटी तूर्त निर्णय घेणार नाही. हा निर्णय घेण्यास सुमारे एक महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागेल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने न्यायालयाने याचिकेची सुनावणी 14 एप्रिलपर्यंत तहकूब ठेवली.
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या ठरावाबरोबरच मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शिवा-अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने ऍड. सतिश तळेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन या नामकरणाला जोरदार विरोध केला आहे.

या याचिकेवर आज न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील ऍड. अभिनंदन वग्यांनी यांनी नामकरणांच्या संदर्भात मंत्र्यांची कमिटी स्थापन केली गेली असली, तरी कमिटी तूर्त निर्णय घेणार नाही. हा निर्णय घेण्यास एक महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याची माहिती न्यायालयात देताना न्यायालयाकडे वेळ मागून घेतला.

याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. तळेकर यांनी परिषदेचा ठरावाला जारेदार आक्षेप घेतला. या परिषदेच्या 24 सदस्यांपैकी 11 जागा रिक्त होत्या. उर्वरित 13 पैकी केवळ 10 सदस्य उपस्थित होते. त्यापैकी 7 शासकिय अधिकारी आणि उरलेल्या 3 सदस्यांपैकी एक सदस्य हा धनगर समाजाचा होता. त्याने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर ठराव मांडला. त्याला दुसऱ्या एका सदस्यांने विरोध केलेला असताना मंजूर करण्यात आलेला ठरावच बेकायदा असल्याचा दावा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)