सोलापूर विद्यापीठ नामकरण वाद हायकोर्टात

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला विरोध 

मुंबई – सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शिवा-अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्यावतीने दाखल केलेल्या या याचिकेची दखल न्या. रणजीत मोरे आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने घेतली आणि उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना उद्या शुक्रवारी 23 मार्चला सुनावणीला हजर रहाण्याचे निर्देश दिले आहेत.

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासंदर्भात राज्य सरकारने स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीद्वारे घेतला आहे. केवळ राजकीय हितासाठीच नामकरणाचा हा घाट घातल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या नामकरणामुळे सोलापूर जिल्हयातील जातीय सलोखा व सामंजस्य नष्ट होऊ नये, म्हणून राजकीय दबावाखाली घेण्यात आलेला आहे. धनगर समाजाला अनुसुचित जमातीत समावेश न झाल्याची नामुष्की दूर करण्याकरिता सोलापूर विद्यापीठ पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देऊन धनगर समाजास खूश करण्याचा हा निर्णय आहे.

हा प्रयत्न ढोंगी आणि केविलवाणा असून सोलापूर जिल्हयातील दोन जातीत तेढ आणि कायमचा दुरावा निर्माण होण्याची भीती याचिकाकर्त्याच्यावतीने ऍड. सतिश तळेकर यांनी न्यायालयात व्यक्त केली. याची द,ल घेऊन न्यायालयाने उद्या 23 मार्चला याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आणि उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना हजर रहाण्याचे निर्देश दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)