सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा मुहूर्त तूर्तास लांबणीवर

मुंबई/सोलापूर: सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा मुहूर्त तूर्तास लांबणीवर पडला आहे. या नामांतरासाठी मंत्रीगट समिती स्थापन केली असून, ही समिती सर्व संबंधित घटकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईल. त्यामुळे किमान 16 एप्रिलपर्यंत यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, अशी हमी राज्य सरकारतर्फे शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

या नामकरणाला शिवा-अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेसह अन्य काहींनी जनहित याचिकेद्वारे आव्हान देत, ही समितीच बेकायदा असल्याचा आरोप केला. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली.

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी धनगर समाजाची होती. तर शिवयोगी सिद्धेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत असल्याने सिद्धेश्वरांचे नाव या विद्यापीठाला द्यावे, अशी मागणी लिंगायत समाजाची होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे. असं असतानाच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीची बैठक घेऊन विद्यापीठाला अहिल्याबाईंचे नाव देण्याचा निर्णय घेतला गेला.

मुळात मंत्री समितीला विद्यापीठ नामांतराबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसून, कायद्याप्रमाणे तो अधिकार विद्यापीठाची सिनेट, व्यवस्थापन परिषद यासारख्या मंचांना आहे. त्यामुळे याप्रश्नी मंत्री समितीची स्थापनाच बेकायदा आहे, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)