सोलापूर: पत्रकारांवरील खोटे गुन्हे रद्द न केल्यास आंदोलन करणार

सोलापूर वृतपत्र पत्रकार संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अकलूज – सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत “एनआरएचएम’च्या कंत्राटी जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात यांच्याविरोधात आरोग्य विभागाच्या बातम्या छापल्याचा राग मनात धरून पत्रकार महादेव नरोटे, अकबर बागवान यांच्या विरोधात थोरात यांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा रद्द करावा, याप्रकरणी चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर वृतपत्र पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून प्रसिध्दी माध्यमात काम करणाऱ्या पत्रकार, संपादक आणि विविध काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जीव घेणे हल्ले होत आहेत. अनेक पत्रकारांच्या दिवसा ढवळ्या निर्घृण हत्या झाल्या आहेत. यातच शासकीय कर्मचार, पोलिस खाते, भ्रष्टाचारी लोक, बेकायदेशीर काम करणारे अशा अनेक क्षेत्रांतील लोक पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशाच प्रकारे सोलापुरातील संपादक महादेव नरोटे व पत्रकार अकबर बागवान यांच्यावर कंत्राटी कर्मचारी वैशाली थोरात यांनी पोलिसात खोटा गुन्हा दाखल केले आहे. हे अंत्यत गंभीर आहे. असे खोटे गुन्हे दाखल झाल्यास समाजात एक प्रकारचे चुकीचे संदेश जात आहे आणि पत्रकाराला वृत संकलन करणेही कठीण झाले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून महादेव नरोटे आणि अकबर बागवान यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करावे अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल .असे नमूद करण्यात आले आहे
निवेदन देताना शिष्टमंडळात विष्णु कारमपुरी, विश्वनाथ व्हनकोरे, राम गायकवाड , सोफी शेख, विजय उघडे , राजु पवार , रमाकांत साळुंखे, नरेश काकडे, मुश्‍ताक शेख, गफुर सौदागर, श्रीनिवास बोगा, बिपीन साबळे, हरी साका आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)