सोलापूरात मोदींचा झंझावती दौरा

85 मिनिटांत सहा विकासकार्यांचा शुभारंभ  

सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर  जिल्ह्यामध्ये तब्बल 85 मिनिटांत सहा विकासकार्यांचा शुभारंभ  करणार आहेत. सकाळी 10 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास मोदी यांचे हेलिकॉप्टरने बिदरहून सोलापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर पार्क स्टेडियममध्ये इलेक्ट्रॉनिक बटण दाबून पंतप्रधान मोदी सहा विकासकामांचे  भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. त्यानंतर ते उपस्थितांशी संवादही साधणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते दळणवळण मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण विकास मंत्री हरजितसिंग गिरी  सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी सोलापूर विमानतळावरुन  हेलिकॉप्टरने बिदरकडे रवाना होतील. पंतप्रधान परदेश दौरे टाळून ग्रामीण भागाकडे अधिक लक्ष देणार आहेत.  2019 लोकसभा निवडणुकांचे भाजप पक्षाकडून रणशिंग फुंकले आहे. येत्या निवडणुकांसाठी  पहिल्यांदाच मतदार बनणाऱ्या लाखो युवकांनी आयुष्यातील पहिले मत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सशक्‍त नेतृत्वाला द्यावे, यासाठी भाजप देशपातळीवर ही खास मोहीम चालविणार आहे,

85 मिनिटांत सहा विकासकार्यांचा शुभारंभ  

-उजनी ते सोलापूर या 360 कोटी रुपये खर्चून साकारण्यात येणाऱ्या समांतर जलवाहिनीचं भूमिपूजन
-स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एबीडी एरियातील 190 कोटीच्या पाणीपुरवठा ड्रेनेज लाईन सुविधा कामाचं भूमिपूजन
-हद्दवाढ भागात महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या अमृत योजनेअंतर्गत 180 कोटींच्या भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन
-महापालिकेच्या वतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या तीन एसटीपी प्रकल्पाचे लोकार्पण
-पंतप्रधान आवास योजनेतून रे नगर फेडरेशन या नियोजित 30 हजार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन
-सोलापूर-उस्मानाबाद या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)