सोलापूरमधील विकासकामे तातडीने मार्गी लावा – सुभाष देशमुख

सोलापूर – नागरिकांच्या सोयीसाठी शहरात विविध विकासकामे मंजूर करण्यात आलेली आहेत. ही कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशी सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना केली.

सहकारमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विकास नगर येथील कार्यालयात आढावा बैठका संपन्न झाल्या. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांची कामे लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, तहसीलदार अमोल कदम, महापालिका उपायुक्त त्र्यंबक डेंगळे पाटील, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, संदीप कारंजे, विजय राठोड, श्री. दुलंगे, स्मार्ट सिटीचे अधिकारी तपन डंके यांच्यासह महापालिका, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग आणि जलसिंचन विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीत सोलापूर जिल्हा तसेच शहरातील विविध समस्या व उपाय यांची चर्चा झाली. सहकारमंत्री देशमुख यांनी शहरातील घंटागाड्यांचे नियोजन, रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी रस्ते रिडिझाईन करणे, रस्ते रुंदीकरण, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण, अमृत योजना, पाणी पुरवठा, जलवाहिनी दुरुस्ती आदी विषयांची माहिती घेतली. त्यांनी शहरातील स्मार्ट सिटीचे काम वेगाने करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली. तसेच कंबर तलाव, स्मृतीवन परिसराच्या सुशोभीकरणासाठी महापालिका व वनविभाग यांनी मिळून काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)