सोलापूरचा लियाकत शेख, पुण्याचा विग्नेश संघवी बाद फेरीत

पहिली स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा
पुणे – सोलापूरचा लियाकत शेख आणि पूना क्‍लबचा विग्नेश संघवी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना पहिल्या अखिल भारतीय स्टरलाईट टेक खुल्या स्नूकर स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. द क्‍यू क्‍लब यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विमाननगर येथील क्‍यू क्‍लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील आजच्या महत्त्वाच्या सामन्यात लियाकत शेख याने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना डेक्‍कन जिमखानाच्या सतीश कराड याचा 72-39, 67-74, 82-09 असा पराभव केला. निर्णायक फ्रेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात लियाकतने 56 गुणांचा ब्रेकही नोंदवित “झ’ गटातून बाद फेरीत प्रवेश केला.

अन्य लढतीत विग्नेश संघवी याने नागपूरच्या अन्शुल दांडेकर याचा 52-50, 66-06 असा सहज पराभव करून एसी गटातून बाद फेरी गाठली. तसेच चुरशीच्या सामन्यात तमिळनाडूच्या दिनेश कुमार याने वाशीच्या सूज वीर याचा 61-19, 44-53, 56-24 असा संघर्षपूर्ण पराभव केला. पिंपळे-निलख येथील विवेक महात्रा याने चंदीगढच्या रणवीर दुग्गल 40-75, 71-34, 61-32 असा पराभव करून स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदविला.

संघर्षपूर्ण लढतीत क्‍यू क्‍लबच्या अन्शुमन दांडेकर याने गुजरातच्या निसर्ग पटेल याचा 32-60, 61-21, 64-34 असा पराभव करून आगेकूच केली. तसेच वसईच्या जुनेद रवानी याने मुंबईच्या प्रशांत चौहान याचा 50-49, 40-57, 59-50 असा पराभव केला. मुंबईच्या खेळाडू प्रमोद पोळ याने सातारच्या कैवल्य चव्हाण याचा 57-12, 59-29 असा सहज पराभव केला. या विजयात प्रमोद याने दुसऱ्या फ्रेममध्ये 51 गुणांचा ब्रेकही नोंदविला.

सविस्तर निकाल-
गटसाखळी फेरी – तहा खान (डेक्‍कन जिमखाना) वि.वि. राहुल पाध्ये (पीवायएफ) 70-50, 88-75; दिनेश कुमार (तमिळनाडू) वि.वि. सूरज वीर (वाशी) 61-19, 44-53, 56-24; हरीश गायकवाड (क्‍यू क्‍लब) वि.वि. दुर्लभ सिसोडिया (बंगलोर) 49-41, 66-59; विवेक महात्रा (पिंपळे-निलख) वि.वि. रणवीर दुग्गल (चंडीगढ) 40-75, 71-34, 61-32; अन्शुमन दांडेकर (क्‍यू क्‍लब) वि.वि. निसर्ग पटेल (गुजरात) 32-60, 61-21, 64-34; लियाकत शेख (सोलापूर) वि.वि. सतीश कराड (डेक्‍कन जिमखाना) 72-39, 67-74, 82 (56)-09; जुनेद रवानी (वसई) वि.वि. प्रशांत चौहान (मुंबई) 50-49, 40-57, 59-50; प्रमोद पोळ (मुंबई) वि.वि. कैवल्य चव्हाण (सातारा) 57-12, 59 (51)-29; सोनब मातंग (वडगांव) वि.वि. सचिन संचेती (पीवायसी) 58-29, 66-56; अभिजीत रानडे (नाशिक) वि.वि. लोगस रेगो (क्‍यू क्‍लब) 65-28, 68-10; आनंद रघुवंशी (क्‍यू मास्टर्स) वि.वि. विशाल पांचाळ (न्यू क्‍लब) 87-07, 67-55; विग्नेश संघवी (पूना क्‍लब) वि.वि. अन्शुल दांडेकर (नागपूर) 52-50, 66-06.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)