सोलापुरात लोकसभेची रणधुमाळी सुरू; राहुल गांधींची 13 फेब्रुवारीला जाहीर सभा

सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी कॉंग्रेस पक्षाकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. मागील दोन महिन्यांपासूनच मतदारसंघात प्रचाराच्या अनुशंगाने शिंदे यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. यंदा सोलापुरात मोदी लाट ओसरली असल्याने शिंदे यांना यंदाच्या निवडणुकीत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपकडून बनसोडे की साबळे
भाजपकडून विद्यमान खासदार शरद बनसोडे की राज्यसभेचे खासदार अमर साबळे यापैकी कोणाचेही नाव निश्‍चित झाले नसले तरी बनसोडे यांचे तिकीट कापून साबळे यांना उमेदवारी देण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून जोरदार चर्चा सुरु आहे. बनसोडे यांच्या उमेदवारीची भिस्त पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर आहे. मागील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद बनसोडे यांच्यासाठी सोलापुरात जाहीर सभा घेतली होती.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा घेण्याचे निश्‍चित झाले आहे. ही सभा 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. राहुल यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी सुशीलकुमार शिंदे यांना उमेवारी देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चेनंतर शिंदे स्वतः कामाला लागले आहेत. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, उत्तर सोलापूर आणि सोलापूर शहरातील अल्पसंख्यांक परिसरातील काही भागावर शिंदे यांची भिस्त आहे. मागील पाच वर्षांत विद्यमान खासदार बनसोडे यांच्याकडून फारसे काम न झाल्याने सोलापूरकर त्यांच्यावर नाराज आहे. याशिवाय सोलापुरातील दोन देशमुखांच्या वादामुळे सोलापूरचा विकासही घेतला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी यंदाची निवडणूक तशी अवघड असली तरी तितकी सोपीसुद्धा असल्याचे बोलले जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)