‘सोलापुरने महाराष्ट्रावर छाप पाडली आहे’

पुणे – सोलापूर शहर जिल्हा अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. सोलापुरची खाद्य संस्कृती, सोलापुरचा वस्त्रोद्योग जगभर प्रसिद्ध आहे. अनेक वैशिष्ट्यांनी नटलेल्या सोलापूर जिल्ह्याने महाराष्ट्रावर छाप पाडली आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरचा गौरव केला.

सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित सोलापूर फेस्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “श्रीमंती सोलापूरची’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, गुरुबाबा महाराज औसेकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, फाउंडेशनचे संचालक अभिजित पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

-Ads-

“सोलापूर सोशल फाउंडेशन’तर्फे सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व प्रगती व्हावी यासाठी “सोलापूर फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टचे उद्‌घाटन हभप गुरुबाबा अवसेकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापुरची विविध उत्पादने, कलादालन, पर्यटन व्यवसाय, खाद्यसंस्कृती आणि चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने हा महोत्सव भरविण्यात आलेला आहे. गेल्या तीन दिवसात या फेस्टला हजारो पुणेकर नागरिकांनी भेट दिली असल्याचे लोकमंगल मल्टीस्टेट को ऑफ सोसायटीचे शाखा सल्लागार सतीश साठे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)