सोलर स्पिनिंग मिलसाठी उपायोजना

नवी दिल्ली – 2.5 लाख रुपयांची गुंतवणूक करून आपला स्वतंत्र व्यवसाय चालू करू शकतो. सोलर स्पिनिंग मिल या छोटया व्यवसायाची सुरुवात आपण करू शकतो. यामध्ये धागा तयार करून तयार कापड बनवता येते. या व्यवसायाकरिता आपल्याला सरकार ही मदत मिळू शकते. यात सरकार 90 टक्‍के कर्ज देते व त्याला 25 टक्‍केपर्यत सबसिडी देण्यात येणार आहे.

सरकारच्या अंतर्गत चलवणऱ्या एजन्सीजकडून खादी व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन (केवीआईसी) याच्याकडून या प्रकल्पाचा अंतर्गत पंतप्रधान रोजगार योजनाद्वारे आपण कर्ज घेऊ शकतो. व्यवसाय चालू करण्याकरिता केवीआईसी रिपोर्टच्या महितीनुसार हा संपूर्ण प्रोजेक्‍टसाठी जवळजवळ 24 लाख 87 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यातील फक्‍त 10 टक्‍के म्हणजे 2 लाख 48 हजार रुपयांची सुरुवातीला गुंतवावे लागणार आहेत. बाकी 90 टक्‍के रक्कम ही पतंप्रधान रोजगार योजनेतून कर्ज घेता येणार आहे.

यासाठी सरकारकडून स्वयंरोजगारला चालना देण्यासाठी सरकार कडून 25 टक्‍के सबसिडी देण्यात येणार आहे. सोलर चरखा व संपूर्ण युनिट उभा करण्यात आल्यानंतरच 6 लाख 22 हजार रुपयांची सबसिडी देण्यात येणार आसून याला खादी ग्रामउद्योग कमिशन मार्जिन असेही म्हणतात. या योजनेसाठी 13 टक्‍के व्याज देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 5 वर्षाच्या कालावधीत या कर्जाची परतफेड करण्यात येईल. पण या व्याजाच्या रकमेला सबसिडीला तडजोड करण्यात येते. यावरून आपणास फक्‍त कर्जाची रक्कम फेडावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)