उरुळी कांचन- दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात महामार्गावर कचरा होत आहे. त्यामुळे गावात विविध प्रकारच्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यासाठीच आपले गाव स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी एक अनोखा उपक्रम सोरतापवाडी येथे करण्यात आला आहे. गावात तसेच महामार्गावर स्वच्छताविषयी माहिती फलक लावण्यात आले असून यापुढे महामार्गावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोरतापवाडीचे सरपंच सुदर्शन चौधरी यांनी दिली
सोरतापवाडी (ता. हवेली) येथील ग्राम स्वच्छता अभियान ला 50 आठवडे पूर्ण झाले आहेत. या अनुषंगाने सोरतापवाडी (ता. हवेली) येथे अभियानांतर्गत महामार्गावर कचरा होऊ नये, कोणी कचरा टाकला तर त्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा स्वरूपाचे जनजागृतीपर फलक लावण्यात आले आहेत.
याबाबत सोरतापवाडी ग्राम स्वच्छता अभियानचे डॉ. गोपाळ हुड यांनी सांगितले की, गावात कचरा झाला तर डमच्छर तयार होऊन नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. सोरतापवाडी स्वच्छता अभियान ग्रूपच्या महिला प्रतिनिधी सुवर्णा चोरगे यांनी सांगितले की, सर्वच ठिकाणी नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर केला तर प्लॅस्टिकचे प्रदूषण होणार नाही.

  • नागरिक महामार्गावरून प्रवास करताना अनेकवेळा कचरा फेकून देतात. त्यामुळे गावाचे गाव पण नाहिसे होत, .तसेच गावाच्या दर्शनी भागात कचरा दिसला तर बाहेरून येणारा नागरिक गावाविषयी नाराज होतो. त्यामुळे आम्ही गावात तर स्वच्छता करतोच; पण महामार्गही स्वच्छ करतो. मात्र, याबाबत लोकांमध्ये जागृती होण्यासाठी यापुढे महामार्गावर कचरा टाकणाऱ्यावर दंड आकारला जाणार आहे, आणि तसे तसे फलकही लावले आहेत.
    – सुदर्शन चौधरी, सोरतापवाडी सरपंच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)