सोरतापवाडीत सॅनिटरी नॅपकिनबाबत जनजागृती

उरुळी कांचन- महिलांमध्ये पाळीच्या आजारांबाबत जागृती होणे गरजेचे आहे, तसेच या दरम्यान वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सबाबत देखील योग्य मार्गदर्शन होणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन दौंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी सागर धुमाळ यांनी केले. भारत सरकारच्या “अस्मिता’ या योजनेअंतर्गत सोरतापवाडी (ता. हवेली) येथे सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराबाबत महिलांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि महिलांच्या पाळीच्या काळातील स्वच्छता यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आरोग्य अधिकारी धुमाळ बोलत होते. या वेळी सरपंच सुदर्शन चौधरी, माजी सरपंच पुनम चौधरी, ग्रामपंचायत सदस्या भारती चौधरी, सुनीता कड, राणी गोरे, अलका हुड, रोहिणी काळे, अर्चना सरोदे, सुवर्णा चोरगे, चंद्रभागा लोणकर, मनीषा म्हस्के, राणी ठाकुर, अक्का सरडे यांसह महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले. यापुढेही ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील महिलांना या नॅपकिन्सचे वाटप करण्यात येणार आहे. त्यावेळी सरपंच सुदर्शन चौधरी यांनी सांगितले की, गावात वेगवेगळ्या पाच ठिकाणी हे नॅपकिन्स नष्ट करण्यासाठी मशीन्स बसवण्यात येणार आहे. या वेळी ग्रामविकास अधिकारी संतोष नेवसे यांनी प्रास्ताविक केल, तर अविनाश मेमाणे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)