उरुळी कांचन- सोरतापवाडी गाव, सोरतापवाडी फाटा (कॅनालपर्यंत) विविध झाडाची रोपे लावली होती. सध्या त्यातील अनेक गुलमोहर झाडे बहरलेली आहे. त्यामुळे दुपारी या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी अनेकजण येतात. पुणे-सोलापूर महामार्ग सोरतापवाडी हे गाव आहे. सुमारे 40 वर्षांपासून बंद असलेली जुना बेबी कालवा सुरू झाल्यामुळे या भागात शेतकरी अतिशय समाधानी झाला आहे. हा बेबी कालवा गावातून जात असल्यामुळे माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सागर नाना चौधरी, माजी सरपंच पूनम सागर चौधरी, माजी उपसरपंच आणि बाजार समितीचे माजी उपसभापती तानाजी चौधरी, गणेश चौधरीसह गावातील नागरिक आणि तरुणांनी झाडांची लागवडी केली. सध्या गुलमोहराची ही झाडे बहरलेली आहेत. त्यामुळे नागरिक दुपारी सावलीत विश्रांती घेण्यासाठी येत असतात. या शेजारुन बेबी कालवा वाहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गारवा लागतो. झाडे बहरलेली असल्यामुळे ती हिरवी गार दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)