सोयाबीन, बाजरी, भूईमूग पिकांची घ्यावयाची काळजी

* कापूस फुले उमलणे ते बोन्ड धरणे – 1. पिठ्या ढेकूण नियंत्रणासाठी बिव्हेरिया बसियाना 75 मिली/ 15लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी. 2. कपाशीची पाने लाल होत असतील तर त्यासाठी युरिया 200 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 70 ग्राम/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* सोयाबीन शेंगा भरणे ते पीक परीक्वता – सोयाबीन शेंगांचा रंग पिवळट तांबुस झाल्यानंतर, जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार 90-110 दिवसांत काढणी करून घ्यावी.
* तूरफांद्या फुटणे – 1. मोठया अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. गुंडाळलेली पाने वेचून नष्ट करावी. 2.शेतामध्ये फुले आणि शेंगा खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी तसेच आर्थिक नुकसानीची पातळी ओळखण्यासाठी शेतामध्ये 4 ते 5 कामगंध सापळे प्रती एकर लावावेत.

* बाजरी दाणे भरणे – जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार काढणी करून घ्यावी.
* भुईमूग शेंगा लागणे-शेंगा भरत असताना जास्तीत जास्त आकार व वजन वाढण्यासाठी 70 ग्रॅम 00:00:50, 50 ग्रॅम मल्टीमायक्रोन्युट्‍रीएंट/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* कांदा वाढ – फुलकिडे व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कार्बोसल्फान 25 ईसी 15 मिली किंवा फिप्रोनील 5 ईसी 15 मिली किंवा डेल्टामेथ्रीन1टक्का + ट्रायझोफॉस 35 टक्के (संयुक्त कीटकनाशक) 20 मिली अधिक मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम किंवा क्‍लोरोथॅलोनील 25ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात साध्या हात पंपाने फवारणी करावी.

* रब्बी ज्वारी पेरणीपूर्व तयारी – रब्बी ज्वारीची पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्‍टोबर या कालावधीत करावी. पेरणीसाठी
1. हलकी जमीन- सिलेक्‍शन-3, फुले माऊली
2. मध्यम जमीन – फुले चित्रा, फुले माऊली, मालदांडी-35-1
3. भारी जमीन – वसुधा, फुले यशोदा, सी.एस.वही.-22
4. बागायतीसाठी – फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.वही.-22 या वाणांचा वापर करावा.

ज्वारीची पेरणी 45 बाय 15 सें मी. अंतरावर करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 4 ग्रॅम गंधक (300 मेष) चोळावे. तसेच 25 ग्रॅम ऑझोटोबॅक्‍टर व पी.एस.बी. या जीवाणू संवर्धकांची प्रक्रिया करून हेक्‍टरी 10 किलो बियाणे वापरावे. जमिनीच्या प्रकारानुसार खतांची मात्रा खालील तक्त्‌यात दर्शविल्याप्रमाणे द्यावी. * नत्र दोन हप्त्‌यात (पेरणीच्या वेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिनयाने अर्धे), संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्यावेळी द्यावे.

* हरभरा पेरणीपूर्व तयारी – हरभरा हे रब्बी हंगामातील पीक असल्याने कोरडे व थंड हवामान त्याला मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे 25 सप्टेंबरनंतर जमीनीची ओल उडुन जाण्यापूर्वी पेरणी करावी यासाठी प्रामुख्याने विजय हा वाण वापरावा. बागायती हरभरा 20ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान पेरावा त्याकरिता दिग्विजय, विराट, विशाल या वाणाचे बीज उपलब्ध करून ठेवावे.

प्रमुख
कृषी विद्या विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
राहुरी तथा प्रमुख अन्वेषक, ग्राकृमौसे, मफुकृवि, राहुरी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)