करंजे- सोमेश्वर पब्लिक स्कुल, सोमेश्वरनगरमध्ये अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते,
शुक्रवारी (दि. 14) श्री गणेश उत्सवा आणि ऋषी पंचमीच्या निमित्ताने शाळेत अथर्वशीर्ष पाठणाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे संचालक आणि स्कुल कमिटीचे अध्यक्ष महेश काकडे उपस्थित होते. सोनम खोमणे, प्रा. यू. आर. वाझा, पर्यवेक्षिका पी. पी. कुलकर्णी यांच्यासमवेत असंख्य पालक महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी विविध कलांची देवता असणाऱ्या गणरायाचे पूजन करून रांगोळी स्पर्धा, पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवणे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सूत्रसंचालन एस. डी. यादव यांनी केले, तर पी. एम. भोसले यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)