सोमेश्‍वर स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

करंजे – सोमेश्‍वरनगर येथील सोमेश्‍वर पब्लिक स्कूल मधील अवधूत जाधवने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 76 टक्के गुण मिळवून तालुक्‍यात प्रथम तर जिल्ह्यात 20 क्रमांक पटकवला आहे. तर कृष्णा यादव 56 टक्के गुण मिळवून तालुक्‍यात 25 वा, तर जिल्ह्यात 526 वा क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका यू. आर. वाझा, चेतन मुळीक, किशोरी साळुंखे, अनिता गाडेकर आणि पूजा पवार या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.सोमेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, शाळा समितीचे अध्यक्ष महेश काकडे, सचिव भारत खोमणे, प्राचार्य यू. आर. वाझा, पर्यवेक्षिका पी. पी. कुलकर्णी, महेंद्र पवार आदींसह पालकांनी विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)