सोमेश्‍वर मॅरेथॉनमध्ये पुण्याचा कल्याण ढगे प्रथम

बारामती- पद्मभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्‍वर स्पोर्टस ऍकॅडमी आयोजीत बारामती तालुक्‍यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच झालेल्या मॅरेथॉन/क्रॉसकंट्री स्पर्धेत खुल्या गटात 32 मिनिटे 53 सेकंदात कल्याण रावसाहेब ढगे या पुण्याचा स्पर्धकाने 10 किमीचा टप्पा गाठून प्रथम क्रमांक पटकविला. दरम्यान, या
स्पर्धेत विद्यार्थी, तरुणासह ज्येष्ठ नागरिक असे 1460 जण धावल्याने अवघी सोमेश्‍वरनगर मॅरेथॉनमय झाली होती.
इंडीयन शुगर मिल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रोहीत पवार, अर्जुन ऍवॉर्ड विजेते काकासाहेबा पवार, आंतरराष्ट्रीय धावपटु व ललीता बाबर यांचे प्रशिक्षक भास्कर भोसले, आंतरराष्ट्रीय धावपटु जगन्नाथ लकडे, सोमेश्‍वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, करंजेपुलचे सरपंच वैभव गायकवाड ,बारामती च्या नगराध्यक्षा पोर्णीमा तावरे ,माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भिलारे ,समर्थ ज्ञानपीठ चे अध्यक्ष अजिंक्‍य सावंत ,सोलापूरचे एसटी विभाग प्रमुख रमाकांत गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत पुणे, सातारा, नगर जिल्ह्यातील 1460 स्पर्धकांनी भाग घेतला. योगेश सोळसकर यांनी आभार मानले.
सोमेश्‍वर स्पोर्टस ऍकॅडमीद्वारे आयोजित उपक्रमाला माजी सैनिक संघटना ,समर्थ ज्ञानपीठ वाघळवाडी, परिसरातील क्रीडा शिक्षक, भारत ज्ञान विज्ञान समुदाय, क्रीडा शिक्षक पी. एम. गायकवाड व सर्व क्रीडा शिक्षक, पत्रकार मित्र व करंजेपुल ग्रामस्थ तसेच देणगीद्वारे मदत करणारे दानशुरांनी सहकार्य केल्याने इतका भव्य कार्यक्रम आपण करु शकल्याचे ऍकॅडमीचे सचिव ऍड. गणेश आळंदीकरा यांनी स्पष्ट केले.
चौकट : गटानुसार प्रथम, द्वितीय, तृतीय विजेते :
10 किमी (खुला गट) : कल्याण ढगे, सतीश जाधव (दोघे पुणे), कय्युम शेख (सातारा). 5 किमी (19 वर्षाखालील) : मुले : आकाश परदेशी, निकेत कडु (दोघे पुणे) चेतन राजेंद्र (इंदापूर). मुली : निकिता हजारे (फुरसुंगी, पुणे), अंजना कुमठेकर (सासवड) अंकीता कोळपे (पुणे). 17 वर्ष : मुले : सुरज कांबळे तर मुलींमध्ये स्वप्ना चौधरी पहिली आली.14 वर्ष (मुली) : रुतुजा कांबळे, वनिता तोरवे, वनिता मोटे. मुले : शरद ठोंबरे, सुमीत शिंदे, साहुराज कोळपे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)