सोमेश्‍वर कारखान्याच्या संचालकपदी प्रकाश जगताप

सोमेश्‍वरनगर – सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या शासन नियुक्‍त संचालकपदी मुरूम (ता. बारामती) येथील प्रकाश किसनराव जगताप यांची निवड करण्यात आली. या कारखान्यावर जगताप यांना दुसऱ्यांदा संचालक होण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कारखान्यावर सहकार कायद्यानुसार शासन नियुक्‍त संचालक साखर आयुक्‍तालयाकडून पाठविण्यात आले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कारखान्यावर शासन कोणाची निवड करेल, याबाबत या परिसरात तर्क वितर्क सुरू होते. पालकमंत्री गिरीष बापट यांनी जगताप यांचे नाव सुचवल्यानंतर साखर आयुक्‍त कार्यालयाने प्रकाश जगताप यांच्या नियुक्‍तीबाबत सोमेश्‍वर कारखान्यास पत्र दिले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत या निवडीस मंजूरी देण्यात आल्याने जगताप यांची निवड करण्यात आली. या अगोदरही 2002 ते 2007 या कालावधीत कारखान्याचे संचालक म्हणून जगताप हे कार्यरत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)