सोमेश्‍वर कारखान्याकडून तीन हजार रुपये दर

File Photo

सोमेश्वरनगर-बारामती तालुक्‍यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामात गळीत झालेल्या ऊस बिलापोटी प्रतिटन तीन हजार रुपये दर जाहीर केला आहे. तीन हजार दर जाहीर करणारा सोमेश्वर हा जिल्ह्यात पहिलाच सहकारी साखर कारखाना ठरला आहे.
शनिवारी (दि. 15) संचालक मंडळाच्या पार पडलेल्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, सोमेश्वर कारखान्याने गेल्या हंगामात पुणे जिल्ह्यात क्रमांक एकने वाटचाल करत 9 लाख 79 हजार ऊसाचे गाळप केले. क्रमांक एकचा 11.99 टक्केचा साखर उतारा ठेवत 11 लाख 74 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखाने जिल्ह्यात सर्वात जास्त 2642 रुपये एफआरपी एकरकमी अदा केली आहे. संचालक मंडळाच्या सभेत सभासदांच्या उसाला 3000 तर गेटकेन धारकांना 2800 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमेश्वर कारखान्याची वाटचाल सुरू असताना कारखान्याचे सभासद, कामगार, ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार या सर्वच घटकांना सोबत घेऊन कारखान्याची वाटचाल करणेबाबत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे वेळोवेळी सांगणे असते.
जगताप पुढे म्हणाले, आपण बाहेरील कारखान्याची परिस्थिती पाहिल्यास काही कारखान्यांनी अद्याप सभासदांना एफआरपी अदा केली नाही. तसेच त्यांची ऊसतोडणी बिलेही देणे बाकी आहेत; परंतु सोमेश्वरने कर्जाची वेळेत परतफेड करत, सभासदांना चांगला दर देण्याचा निर्णय घेतल्याने संचालक मंडळाला समाधान वाटत आहे. दरम्यान सभासदांच्या ऊस उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषिभूषण संजीव माने यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. येणाऱ्या हंगामासाठी आजपर्यंत 29 हजार 400 एकरांवर ऊस लागवडची नोंद झाली आहे. या व्यतिरिक्त ऊस गाळपास कारखान्याने 1100 बैलगाडी, 350 ट्रक ट्रॅकटर, 200 डम्पिंग आणि 7 हार्वेस्टरशी करार केले असून सर्व ऊसतोडणी यंत्रणेस ऍडव्हान्स अदा केलेले आहे.

  • 28 सप्टेंबरला वार्षिक सभा
    कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. 28 रोजी कारखान्याच्या कार्यस्थळावर दुपारी 1 वाजता आयोजित केली आहे. या सभेस सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)