“सोमेश्‍वर’मध्ये 10 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

सोमेश्‍वरनगर- श्री सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने उसाचे गाळप आज अखेरीस 8 लाख 50 हजार 040 मे टनाचे गाळप केले असून त्यामधून 10 लाख 04 हजार 450 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. संपूर्ण जिल्ह्यात कारखान्याने 11. 90 टक्के सरासरी उतारा मिळवित वाटचाल करीत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
श्री सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात आज (सोमवारी)अखेरीस 10 लाख 1 हजार 111 साखर पोती तयार केली असून त्याचे पूजन कारखान्याचे संचालक शैलेश रासकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष जगताप बोलत होते. याप्रसंगी संचालक नामदेव शिंगटे, किशोर भोसले, सिद्धार्थ गिते, महेश काकडे, विशाल गायकवाड, शांताराम कापरे, सचिन खलाटे, ऋतुजा धुमाळ, रंगराव जगताप, सुरेश जेधे, राजेंद्र धुमाळ, कारखान्याचे अधिकारी, सभासद, कामगार आदी उपस्थित होते.
पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून 7,84,73,397 युनिट्‌सची वीजनिर्मिती केली आहे. तर 5, 30, 77, 000 युनिट्‌ची वीजविक्री केली आहे. त्यासोबत कारखान्याच्या अद्ययावत डिस्टिलरी प्रकल्पामधून सरासरी 272.68 टक्केची रिकव्हरी राखत 63, 64, 388 लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले आहे. कारखाना व सर्व प्रकल्प सुरू राहण्यासाठी सर्व सभासदांचे व कामगारांच्या सहकार्य लाभले असून कारखाना हंगाम सर्वांच्या सहकार्याने गतवर्षीप्रमाणे यशस्वीरित्या पार पडेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यकारी संचालक सुरेश तावरे यांनी मानले.

  • एफआरपीप्रमाणे 2642 रुपये जमा
    कारखान्याच्या सभासदांना गुरुवार (दि. 15) पर्यंतचे एफआरपीप्रमाणे 2642 रूपये प्रतिटनामागे रक्कम जमा केली असून चालू गळीत हंगामात दहा लाख मे. टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. सभासदांचा संपूर्ण ऊस गाळण्यास संचालक मंडळ बांधिल असल्याने उर्वरित ऊस लवकरात लवकर गाळपास आणला जाईल असे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)