सोमेश्‍वरनगर परिसराला अवकाळीने झोडपले

30 मिमी पावसाची नोंद : जिरायती भागाला दिलासा

करंजे- सोमेश्‍वरनगर (ता.बारामती) परिसरात आज (मंगळवार) पहाटे साडेचारच्या सुमारास मुसळधार अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने दुष्काळी जिरायती भागाला दिलासा मिळाला आहे. तर सुमारे 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पाऊस दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर त्याने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला तर सोबतच रब्बी हंगामातील पिकांची लागवडच शेतकऱ्यांनी केली नव्हती. तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेल व विहिरीला पाणी होते त्यांनी रब्बीचे पीक घेतले. त्याच तब्बल पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर सोमेश्‍वरनगर परिसीरातील करंजेगाव, चौधरवाडी, सोमेश्रनगर मंदिर, मुरूम, वाणेवाडी, निंबुत, होळ या परिसराला जोरदार पावसाने झोडपून काढल्याने बळीराजा आनंदी झाला आहे. या दमदार पावसामुळे ओढे, नाले तुंडुब भरून वाहिले. या दमदार पावसाने तरकरी पिकांचे नुकसान झाले असले तरी रब्बी हंगामातील पिकांना नसंजीवनी मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)