सोमेश्‍वरनगर परिसरात शालेय मुलीवर अत्याचार

सोमेश्‍वरनगर – अकरा वर्षाच्या शालेय मुलीवर एका 43 वर्षीय नराधमाने दोनवेळा अत्याचार केल्याची घटना शनिवारी (दि. 26) रात्री सोमेश्‍वरनगर परिसरात घडली. त्या नराधमाला पोलिसांच्या संयुक्‍त कारवाईत फिर्यादीनंतर अवघ्या सात तासांत आज (रविवारी) अटक करण्यात यश आले. त्याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात पोस्को व ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकाराची माहिती देताना पत्रकार परिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर म्हणाले की, शनिवारी पीडित मुलगी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कामानिमित्त एका दुकानात गेली होती. तिचे काम झाल्यानंतर ती माघारी घरी येत असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराने तिला जबरदस्ती गाडीवर बसविले व जवळच्या नीरा डाव्या कालव्याच्या रस्त्याने एका शेतात नेले आणि दोन ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. याबाबत पीडित मुलीच्या आईने आज सकाळी अज्ञात व्यक्‍तीविरोधाअ फिर्याद दिली. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर बारामती व नंतर पुणे येथे वैद्यकीय उपचार करण्यात आले. दरम्यान, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक व अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली व बापू बांगर यांच्या नेतृत्त्वाखाली वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन पाटील व पोलीस कर्मचारी वाघ, जायपत्रे यांनी सापळा तयार केला. त्यांनी सीसीटीव्ही व मोबाईल लोकेशनद्वारे नराधमाचा ठाव ठिकाणा घेतला व त्याच्या मुसक्‍या आवळल्या. काही कायदेशीर सोपस्कार बाकी असल्याने आरोपीचे नाव लगेच सांगणे शक्‍य नसल्याचे बांगर यांनी सांगितले.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्याच्यावर अनूसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ऍट्रॉसिटी), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को), अपहरण असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास बापू बांगर करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)